भ्रष्टाचाराविरोधात प्रतीकात्मक तिरडी यात्रा आंदोलनाला यश…! माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे शेकडो कार्यकर्ते व नागरिक आंदोलनात सहभागी.

  • प्रतिनिधी : विरार : नितीन राणे :- वसई-विरार शहर म हापालिकेतील अनियमित कारभार व व त्यातील भ्रष्टाचा राविरोधात प्रतीकात्मक तिरडी यात्रा आंदोलन करण्याचा निर्णय माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाने घेतला होता.
  • त्यानुसार. शुक्रवार, 19 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता विराटनगर हिंदू स्मशानभूमीतून महापालिका मु ख्यालयापर्यंत प्रतीकात्मक तिरडी यात्रा काढण्यात आली त्यावेळी अनेक पालघर जिल्ह्यातून पदाधिकारी सहभागी झाले होते.
  • मागील काही वर्षांत वसई – विरार महापालिकेच्या प्रत्येक प्रभागात प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे. त्यामुळे अमलब जावणी सक्त संचलनालयाने अनेक अधिकाऱ्यांची चौक शी सुरू केलेली आहे.
  • या चौकशीमुळे पालिकेच्या कारभारात शिस्तबद्धता व ज रब निर्माण होईल, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांना असताना. प्रत्यक्षात; पालिकेच्या कारभारात सुधारणा हो त नाही.
  • किंबहुना; हा भ्रष्टाचार अधिकाधिक वाढत असून सर्वसा मान्य नागरिकांच्या सोयीसुविधांवर त्याचा परिणाम होत आहे. शिवाय; करदात्या नागरिकांच्या कोट्यवधी रुपयांचे पालिका अधिकाऱ्यांनी शोषण चालवलेले आहे.
  • वसई विरार शहर करदात्यांना नागरी सुविधांचा अभावाम ध्ये स्मशानभूमीत लाकडाचा तुडवता, वैद्यकीय साहित्या चा अभाव,माहिती अधिकारी कायद्याअंतर्गत मागविण्यात येणारी माहिती उपलब्ध करून न देणे,वारंवार निलंबती केलेले स्थायी अधिकारी निलंबन काळात गुन्हे करून त्यां ना कायमस्वरूपी बडतर्फ न करणे, तेच रस्ते तेच खड्डे तो च ठेकेदार, टोइग व्हॅन द्वारे जप्त केलेली वाहने मनपा जा गेत बेकायदेशीर अटकवू ठेवणे दैनंदिन बाजार वसुली भ्र ष्ट ठेकेदार, भ्रष्ट वॉलनेम पुरवठा ठेकेदार, परदेशी दौऱ्याव र गेलेले स्थायी कर्मचारी, दोषी अधिकारी कर्मचारी यांचे अहवाल सार्वजिंक करणे, अनिल पवार यांचा कार्यकाळा तील वशिलांवर घेतलेले ठेका कर्मचारी यांची चौकशी क रून,अधिकृत भरती जाहीर करणे, उद्यानाची दुरवस्था, फे रीवाले सर्वेक्षण करण्याकरिता अंदाजित 1 कोटीची केले ल्या खर्चाची चौकशी करणे इत्यादी मुद्द्यांचे फलक आंदो लनात झळकून भ्रष्ट ठेकेदारांना काळया यादीत समाविष्ट करा म्हणून प्रामुख्याने आंदोलनात मुद्दे ठामपणे मांडले होते.
  • दीर्घ काळानंतर माहिती अधिकार कार्यकर्ते आक्रमक झा ल्यानंतर वसई विरार शहर मनपाचे उपायुक्त दिपक झिं झाड साहेब आंदोलन ठिकाणी हजर राहून आपल्या मा गण्या कारवाई करीता संबंधित विभागांना प्रस्तावित केले ल्या असून त्याचे अहवाल मागून घेतो शिवाय एक बैठक आयोजित करू असे जमलेल्या आंदोलकर्त्यांना संबोधित केल्यानंतर कारवाई करीता संबंधित विभागाला दिलेले पत्र माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाला दिले.
  • दरम्यान; तिरडी यात्रा आंदोलनासंदर्भात माहिती अधिका र कार्यकर्ता महासंघाने महापालिका प्रशासनाला कल्पना दिलेली होती.
  • त्याअनुषंगाने त्यांनी त्यांच्या कारभारात सुधारणा करणे अपेक्षित होते. परंतु महासंघाच्या मागण्यांची पूर्तता त्यांनी केली नव्हती. त्यामुळेच हे आंदोलन करण्यात आले.
  •  विशेष म्हणजे; महासंघाने सादर केलेल्या निवेदनात महा पालिका कारभारातील गंभीर त्रुटी, भ्रष्टाचार आणि नागरि कांविषयीची निष्काळजी ठळकपणे मांडलेली आहे.
  • नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा करण्याऐवजी प्रशा सनाने त्यांना नरकासमान परिस्थितीत जगायला भाग पा डत आहे, अशी संतापजनक प्रतिक्रिया कदम यांनी दिली आहे.
  • त्यामुळे निर्लज्ज व बेशिस्त पालिका प्रशासनाविरोधात  नागरिक व माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाने प्रती कात्मक तिरडी यात्रा आंदोलन काढण्याचा निर्णय घेऊन आज आंदोलन केले असे ते म्हणाले.
  • नेपाळमधील शासन अव्यवस्था व भ्रष्टाचाराविरोधात तेथी ल झेन जी जनरेशनने क्रांती आणण्याचा प्रयत्न केलेला आहे.
  • त्याच धर्तीवर माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ या आं दोलनाच्या माध्यमातून वसई-विरार शहरात किमान अपे क्षित बदल घडवण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
  • त्याकरिता आम्ही मनपाचे कोणतेच आर्थिक नुकसान क रणार नसून पालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांना त्यांची जागा नक्कीच दाखवून देऊ असे महेश कदम म्हणाले.
  • त्यावेळी नारायण घाडी, कुणाल सूर्यवंशी, राजेंद्र ढगे रुग्ण मित्र, नितीन राणे,मिलिंन वैध,अनंत पाटील, नितीन पवार, अरविंद गावडे,किशोर ठाकरे,संदीप नोपती, सुधीर कुशल, प्रवीण इंगोले, निलेश जाधव, अरुण पाटील, जसवंत चौ हान, माणिक कोठावळे, गणेश लाड , बाळू साळवे, राजम न विश्वकर्मा, जगताप काका, श्री निवास मुळीक,सोनी का का,रमण धम्पलवार,सुनील बेर्डे,श्रीधर पाटील, संसारे सह इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
  • दरम्यान माहिती अधिकार कार्यकर्ता कडून पुढील काळा त पालघर जिल्ह्यातील प्रशासकीय कार्यालयावर्ती आंदो लन करून भ्रष्ट अधिकाऱ्यांना वठणीवर असणार अस ल्याचे महेश कदम यांच्याकडून सांगण्यात आले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles