पंचक्रोशी ग्रामविकास समितीचा खिणगिणीतील गीतांजली थिलवे यांना मदतीचा हात.

  • प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :-जिथे संकट असतं, तिथं माणुसकीचं खंबीर रूप समोर यावं, हेच खऱ्या समा जाचे लक्षण असते आणि आपल्या पंचक्रोशी ग्रामविकास समितीने हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं आहे.
  • राजापूर तालुक्यातील खिणगिनी या गावातील सौ.गौरी वालम यांच्या बहीण गीतांजली थिलवे हिच्या दोन्ही किड न्या निकामी झाल्याने त्यांना तात्काळ किडनी प्रत्यारोप णाची आवश्यकता भासली.
  • मीरा रोड येथील ओकार्ड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना सुमारे ₹१० लाखांपर्यंत खर्च येणार असल्याची माहिती समोर आली.
  • या परिस्थितीत त्यांच्यावर आर्थिक आणि मानसिक मोठं ओझं येऊन पडलं.
  • या कठीण प्रसंगी श्री.सचिन वालम,शीळ गावाचे महेश गों डाळ यांनी मंत्रालयात असलेले आमदार सदाभाऊ खोत यांचे स्वीय सहाय्यक आणि पंचक्रोशी ग्रामविकास समिती चे प्रशासकीय समिती प्रमुख मा.श्री.आदिनाथ कपाळे यांच्याशी संपर्क करून दिला.
  • त्यांनी तात्काळ या प्रकरणाची दखल घेतली आणि मुख्य मंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या माध्यमातून केवळ दोन दिवसात ₹२ लाखांची आर्थिक मदत मंजूर करून दिली.
  • ही मदत केवळ आर्थिक आधार नाही, तर त्या कुटुंबासाठी एक नवसंजीवनी आहे. आज माणुसकीचा एक हात पुढे आला आणि त्यातून एक जीव वाचला आहे.
  • त्यामुळे श्री. आदिनाथ कपाळे यांच्या तत्पर कार्यासाठी खिणगिणीचे श्री. सचिन वालम आणि शीळचे श्री.महेश गोंडाळ यांनी मनःपूर्वक आभार मानले.
  • अडचणीच्या काळात कायम माणुसकीचा हात पुढे कर णाऱ्या आपल्या पंचक्रोशी ग्रामविकास समितीचे मनापा सून आभार मानण्यात आले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles