श्रीराम विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न.

  • प्रतिनिधी : प्रमोद तरळ :- लांजा:- (प्रमोद तरळ) लांजा वेरवली पंचक्रोशी शिक्षण मंडळ संचलित श्रीराम विद्याल य वेरवली बुद्रुक मध्ये सन 1998 – 99 यावर्षी इयत्ता दहा वी मधून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांच्या बॅचचा स्नेह मेळा वा उत्साहात संपन्न झाला.
  • याप्रसंगी सनईच्या सुरात पुष्पृष्टीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचे व त्यांच्या गुरुवर्यांचे स्वागत करण्यात आले ईशस्तवन व स्वा गत पद्य झाल्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांचे व माजी विद्यार्थ्यांचे लेखणी देऊन स्वागत करण्यात आले.
  • संस्थेचे अध्यक्ष श्री.मारुती डोळस, सचिव श्री.संतोष पडव ळकर, सहसचिव श्री.सुरेश चव्हाण,शालेय समितीचे अध्य क्ष श्री.अमोल रेडीज, संमेलन समिती अध्यक्ष श्री रविंद्र डोळस, संस्था प्रतिनिधी श्री.सुरज कुरतडकर, संमेलन समिती सदस्य श्री शशिकांत करमरकर, मुख्याध्यापक श्री अरुण डोळे,1982 च्या बॅचचे माजी विद्यार्थी श्री सदानंद बोडस या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत सदर बॅचला अध्यापन करणाऱ्यांपैकी श्री किरण बेर्डे सर व सौ श्रद्धा गांगण मॅडम यांचा माजी विद्यार्थ्यांच्या वतीने शाल व बुके देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
  • माजी विद्यार्थ्यांच्या वतीने प्रतिनिधी स्वरूपात आपल्या भावना व्यक्त करताना सौ शिल्पा आंबर्डेकर यांनी या सोह ळ्याचे कौतुक करून विद्यालयाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली व आपल्या आठवणी जाग्या केल्या.
  • संस्था व प्रशाले कडून केलेल्या जाहीर आवाहनाला आप ण उत्तम प्रतिसाद दिलात त्याबद्दल त्यांचे आभार मानून आपल्यातील ज्ञान व कौशल्य यांचे सध्याच्या विद्यार्थ्यांना उपयोजन व्हावे व त्यासाठी आपण जरूर प्रशालेशी संप र्कात रहावे असे आवाहन शालेय समिती अध्यक्ष श्री अमो ल रेडीज यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांना केले.
  • विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अरुण डोळे यांनी याच बॅच चे प्रतिनिधी आणि विद्यमान संचालक श्री शैलेश डोळस यांच्या संस्थेमधील एकूण योगदानाची माहिती देऊन पुढी ल काळात होणाऱ्या भव्य समारंभाचे निमंत्रण दिले व अ शाच प्रकारे विद्यालयाच्या प्रत्येक बॅचने एकत्र येऊन विद्या लयाशी संपर्क ठेवावा असे आवाहन केले.
  • सकाळ सत्रात झालेल्या या कार्यक्रमानंतर पुढील दिवस या बॅचने शालेय परिसरामध्ये,आपल्या वर्गामध्ये, आपल्या बेंचवर आपल्या शैक्षणिक आठवणी जागृत करण्यात व्यतीत केला.
  • या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री सचिन कांबळे यांनी केले आणि हा कार्यक्रम यशस्वी कर ण्यासाठी माजी विद्यार्थी स्नेह मेळावा समितीने अथक मेहनत घेतली.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles