
कोकणातील शेतकरी, कष्टकरी, मुंबईस्थीत मित्र हो जागे व्हा.. जमीनी वाचवा – शेतकरी मित्र यशवंत शिंदे.
- प्रतिनीधी : रत्नागिरी : प्रमोद तरळ :- “कोकणची माण से साधी भोळी त्यांच्या काळजात भरली शहाळी” अशी कोकणातील माणसे असून समृद्ध कोकण हा अधिक समृ द्ध करण्याची व कोकणचे कांँलीफोर्निया करण्याची मह त्त्वाकांक्षा बाळगलेले माजी मुख्यमंत्री पै.बँ.अब्दुल रहिमा न अंतुले यांना ते स्वप्न साकार करायचे होते.
- पण राहून गेले परंतु त्याची स्मृती लोकप्रतिनिधीना नाही. असो. कोकणचा आर्थिक व्यवहार देशाच्या अर्थव्यवस्थेत जमेचा मानल जातो.

- कोकणातील पिकांचे नांव जगात प्रसिद्ध आहे हापूस आं बा आपलं नाव सर्वांच्या हृदयात कोरुन ठेवले आहे आणि त्याचे नाव घेताच लोकांच्या जीभेवर पाणी सुटते अशी अ नेक फळांनी नटलेल कोंकणातील सौंदर्य आहे.
- त्या जमिनी वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे.नाही तर आपलं गाव अस्तित्व धोक्यात आहे. सध्या जमीन विक्री खरेदी यामध्ये पडद्याआड शेतकऱ्यांची फस वणूक होत आहे.
- जमीनी गिळंकृत होत आहेत आरक्षण रद्द होतं आहे शा ळा बंद पडत आहेत.
- खाजगी वाहतूक व्यवस्था लूटत आहेत शासन प्रशासन अधिकारी व्यस्त आहेत प्रत्येक ठिकाणी खेटा माराव्या लागत आहेत.
- म्हणून आपण वेळीच सावध व्हा गावा गावात धनदांडगे घूसत आहेत.
- आपल्याच शेतातील माती,दगड जंगलातील झाडे,लाकडे हे काही ठराविक लोकांना हाताशी धरुन विकली जात आहेत गुरं चोरीला जाण्याचे भयंकर प्रकार घडत आहेत.
- वन्यप्राणी गावात शहरात वावरत नुकसान करत आहेत. फळ बागा शेती, भाजीपाला पिके,कडधान्य यांच्या त्रासा ला वैतागून गेला आहे मजूर परवडत नाहीत.
- शासन हे नावाप्रमाणेच कष्टकरी शेतकरी वर्गाला शासन करीत आहे.तक्रारी असून देखील प्रशासन सुस्त आहे. हे कोण….? पहाणार याचा दोष कुणाला द्यायचा.
- पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे वणवे लावले जात आहेत की लागतात ते समजून येत नाही हळू हळू काय…?घडत आहे.
- यासाठी आपल्याला ही वेळ काढून गावाला गेले पाहिजे. आपलं गावातील घडामोडींवर लक्ष असायला हवे गावाती ल उरल्यासुरल्या सहकाऱ्यांना एकत्र करुन,माहिती घ्याय ला हवी.
- उरल्या सुरल्या जमीनी वाचवण्यासाठी प्रत्येक गाव मंड ळाने ठराव घ्यायला हवेत. आपला ७/१२, ८/अ उतारा , गाव नमुना वेळोवेळी तपासायला हवेत फेरफार,वेळोवेळी तपासून घेणं आवश्यक आहे,अन्यथा पुढं काळ कठीण आहे.
- काही गावांतील गावठाणातील जमीनी सुद्धा परस्पर गावा बाहेरच्या व्यक्ती शासन अधिकारी यांना हाताशी धरुन अडवल्या जात आहेत तर मग ,गाव सुद्धा जागेवर असेल का..? याचा भरवसा नाही..
- काही लोकप्रतिनिधी फक्त आश्वासनांची खैरात करीत आ हेत बेरोजगारी वाढत आहे.
- खरा विकास दुरच आहे म्हणून योग्य व पर्याप्त शिक्षण घे ऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करुन जमेल तसं शेती कडे सुद्धा लक्ष घाला..भविष्यात काय…? वाढलं असेल याची दखल घ्यावी असे आवाहन यशवंत शिंदे यांनी कोक णवासीयांना केले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






