परंडा तालुक्यात झोपडपट्टी धारकांच्या पुनर्वसनासाठी पत्रकार परिषद: सातबारा नोंद व कायमस्वरूपी हक्काची महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सूरक्षा दल यांची मागणी.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूख शेख :- परंडा येथील शास कीय विश्रामगृह येथे महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा द लाच्या वतीने एका विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन कर ण्यात आले होते.
  • संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भगवान बैराट यांच्या मार्गदर्श नाखाली बैठक संपन्न झाली परंडा तालुक्यातील अतिक्र मित झोपडपट्टी धारकांच्या विविध ज्वलंत प्रश्नांवर याम ध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली.
  • नवीन नियमानुसार सर्वेक्षण सुरूशासनाच्या नवीन निय मावलीनुसार सध्या परंडा तालुका व परिसरातील विविध भागांमध्ये झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण सुरू आहे.
  • या मोहिमेत पात्र ठरणाऱ्या झोपडपट्टी धारकांची माहिती संकलित केली जात असल्याची माहिती संघटनेच्या पदा धिकाऱ्यांनी दिली.
  • प्रमुख मागण्या आणि संघटनेची भूमिकाक्ष:
  • कायमस्वरूपी मालकी हक्क : अनेक वर्षांपासून वास्त व्यास असणाऱ्या नागरिकांना त्यांच्या जागेचा कायदेशीर मालकी हक्क मिळावा.
  • सातबारा नोंद: पात्र झोपडपट्टी धारकांच्या नावावर जमि नीची सातबारा नोंद करण्यात यावी.
  • योग्य पुनर्वसन: प्रशासनाने कोणत्याही गरिबावर अन्याय न करता त्यांचे हक्काचे पुनर्वसन करावे.
  • शासकीय योजनांचा लाभ: सर्व पात्र कुटुंबांना शासना च्या विविध कल्याणकारी योजनांचा थेट लाभ मिळवून द्यावा.
  • प्रशासनाकडून सकारात्मक भूमिकेची अपेक्षागोरगरीब आणि सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटना सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा करणार आहे.
  • या संवेदनशील विषयावर स्थानिक प्रशासनानेही सकारा त्मक आणि सहानुभूतीपूर्वक भूमिका घ्यावी,अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
  • या पत्रकार परिषदेला राजाभाऊ चव्हाण, सोनवणे, गोवर्ध न शिंदे .दयानंद बनसोडे . यांच्यासह तालुक्यातील अनेक नागरिक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles