
भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त दिल्लीत भव्य राष्ट्रीय जनजाती सांस्कृतिक महासंगम; महाराष्ट्रातून हजारोंचा सहभाग.
- प्रतिनीधी : हर्षल ठाकरे :- अखिल भारतीय जनजाती सुरक्षा मंचच्या वतीने भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त देशभरातील जनजाती बांधवांचा भव्य राष्ट्रीय स्तरावरील “जनजाती सांस्कृतिक समागम” कार्यक्र म रविवार, दिनांक २४ मे २०२६ रोजी दिल्ली येथील लाल किल्ला मैदानावर आयोजित करण्यात आला आहे.
- या कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा प्रमुख अ तिथी म्हणून उपस्थित राहणार असून विविध राज्यांतील जनजाती संघटनांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

- जनजाती सुरक्षा मंच स्थापनेनंतर तब्बल 21 वर्षांनी होत असलेल्या या ऐतिहासिक राष्ट्रीय मेळाव्यास देशभरातील सुमारे ५०० जनजाती समूह सहभागी होणार असून दीड लाखांहून अधिक जनजाती बांधव एकत्र येणार असल्या ची माहिती आयोजकांनी दिली आहे.

- या महासंगमात महाराष्ट्रातून रेल्वे, खासगी वाहने तसेच इतर वाहनांद्वारे मोठ्या प्रमाणावर समाजबांधव दिल्ली कडे रवाना होणार आहेत.
- राज्यातील विविध जिल्ह्यांतून अंदाजे 15 ते 20 हजार महिला-पुरुष सहभागी होतील, तर देवगिरी प्रांतातील तेरा जिल्ह्यांचे नेतृत्व जनजाती सुरक्षा मंचचे संयोजक डॉ.वि शाल वळवी करीत आहेत.

- दिल्लीतील लाल किल्ला मैदानावर होणाऱ्या या कार्यक्र मात जनजातींच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा गौरव करण्यात येणार आहे.
- विविध राज्यांतील पारंपरिक नृत्य, वेशभूषा, लोककला आणि संस्कृतीचे दर्शन या महासंगमातून घडणार असून सांस्कृतिक आदानप्रदानासाठी राष्ट्रीय व्यासपीठ निर्माण होणार आहे.

- तसेच सामाजिक समरसता आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश या कार्यक्रमातून दिला जाणार आहे.
- कार्यक्रमासाठी आरोग्य सेवा, निवास, भोजन, वाहतूक, सुरक्षा आणि स्वच्छता यांसह सर्व सुविधांची व्यापक व्यवस्था करण्यात आली आहे.
- दिल्लीतील नागरिक आणि कार्यकर्त्यांनी विविध राज्यांतू न येणाऱ्या जनजाती बांधवांच्या स्वागतासाठी पुढाकार घे तला असून यासाठी तब्बल 20 विभाग आणि विविध स मित्यांची स्थापना करण्यात आली आहे.

- “तू-मैं एक रक्त” ही राष्ट्रीय भावना अधिक दृढ करण्यासा ठी हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास ज नजाती सुरक्षा मंचच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.
- दुर्गम वनक्षेत्रात राहणाऱ्या देशभरातील जनजाती बांधवांना प्रथमच मोठ्या प्रमाणावर एकत्र येण्याची संधी मिळणार असल्याने समाजामध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

- जनजाती सुरक्षा मंच (देवगिरी प्रांत) चे संयोजक व केंद्रीय टोळी सदस्य डॉ. विशाल वळवी, सहसंयोजक मौल्या गा वित तसेच सदस्य अशोक पाडवी, भरत गावित, हर्षल ठा करे यांनी समाजबांधवांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून संस्कृती संरक्षण आणि राष्ट्रीय व्यासपीठावरील वैचारिक चर्चेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






