पळसंबचा कोकमवाला शाळकरी मुलगा १२ वर्षीय वेदांत सावंतची धडपड कोकणी तरुणांसाठी प्रेरणादायी.

  • प्रतिनीधी : पळसंब : प्रमोद तरळ :- ग्रामीण भागातील तरुण रोजगाराच्या शोधात शहराकडे धाव घेत आहेत, अशा काळात एका शाळकरी मुलानं रोजगार निर्मितीचा नवा धडा गिरवला आहे.
  • मालवण तालुक्यातील पळसंब (वायंगणकर वाडी) येथील अवघ्या १२ वर्षांच्या वेदांत रवीकांत सावंत या शाळकरी मुलाने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर सर्वांस मोर एक नवा आदर्श उभा केला आहे.
  • शाळा शिकता शिकता घराला आर्थिक हातभार लावण्या साठी वेदांत करत असलेली धडपड कोकणातील तरुणा ईला निश्चितच प्रेरणा देणारी आहे.
  • वेदांत सध्या इयत्ता सहावीमध्ये शिकत आहे. त्याचे आई-वडील दोघेही शेतमजूर असून घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे.
  • अशा परिस्थितीत आई-वडिलांना मदत व्हावी म्हणून वेदां त उन्हाळ्याच्या सुट्टीत कोकम (अमसूल) निर्मितीच्या कष्टाच्या कामात स्वतःला झोकून देतो.
  • रानातून रातांबे गोळा करणे, त्यातील पांढरा गर आणि बी बाजूला काढणे, रसापासून आगळ आणि कोकम सिरप तयार करणे,ही सगळी कामे तो अत्यंत कौशल्याने करतो. रातांब्याची सालं उन्हात ३ ते ४ दिवस वाळवावी लागतात.
  • प्रत्येकवेळी ऊन देण्यापूर्वी ती कोकमाच्या रसात बुडवून पुन्हा वाळत घालावी लागतात. रणरणत्या उन्हात दररोज संध्याकाळी सुकलेली सालं गोळा करणे आणि दुसऱ्या दि वशी सकाळी ती पुन्हा उन्हात घालणे, हे जिकिरीचे काम वेदांत न चुकता करतो.
  • एवढेच नाही तर कष्टाने तयार झालेले कोकम वेदांत स्वतः आचरा येथील आठवडी बाजारात नेऊन विकतो. यंदा बाजारात कोकमाला प्रति किलो ७०० ते ८०० रुपये भाव मिळत आहे.
  • रातांबे गोळा करण्यापासून ते थेट बाजारात कोकम विके पर्यंतची सर्व प्रक्रिया हा चिमुरडा एकटाच पार पाडतो आ णि त्यातून मिळणारे पैसे आपल्या आईच्या हातात सुपूर्द करतो.
  • परिस्थितीशी दोन हात करणाऱ्या वेदांतचे सध्या सोशल मीडियातून जोरदार कौतुक होत आहे.
  • राजापूर तालुक्यातील ससाळे गावचे पत्रकार सुनील घुमे यांच्या माध्यमातून वेदांतची ही यशोगाथा समोर आली आहे.
  •  तुम्ही विकत घेणार वेदांतचे कोकम?
  • कष्टकरी वेदांतच्या या प्रामाणिक प्रयत्नांना आणि जिद्दी  ला समाजाच्या पाठबळाची गरज आहे.
  • सुजाण नागरिकांनी आणि पर्यटकांनी वेदांतकडून अस्सल गावठी कोकम खरेदी केल्यास, त्याच्या कष्टाचे चीज होई ल आणि या बालकाला पुढील शिक्षणासाठी व कुटुंबाला आर्थिक मदत लाभेल, असे आवाहन करण्यात येत आहे.
  • संपर्क
  • वेदांत रवीकांत सावंत मुपो पळसंब (वायंगणकरवाडी), ता.मालवण, जि. सिंधुदुर्ग, पीन कोड – ४१६६१४ आचरा बंदरापासून ६ किमी अंतर कणकवलीपासून २४ किमी अंतर मोबाईल – 92720 37324
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles