परंडा तालुक्यातील ज्येष्ठ शिवसैनिक हरी नारायण सल्ले (भोञेकर) यांचे निधन ;भोञा गावात शोकाकुल वातावरणात अंत्यविधी.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- परंडा तालुक्यातील भोञा येथील रहिवासी आणि शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री.हरी नारायण सल्ले (वय ८० वर्षे) यांचे शनिवार, दिनां क २० जून रोजी उपचारादरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
  • त्यांच्या निधनाने परंडा तालुक्यातील एका निष्ठावंत आणि जुन्या पिढीतील शिवसैनिकाला तालुका मुकला असून,भो ञा गावासह परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
  • ज्ञानेश्वर तात्यांचे कट्टर विश्वासूश्री. हरी नारायण सल्ले हे १९९० च्या दशकापासून शिवसेनेत अत्यंत सक्रिय होते.
  • माजी आमदार कै. ज्ञानेश्वर तात्या पाटील यांचे अत्यंत वि श्वासू, खंदे आणि कट्टर समर्थक म्हणून त्यांची तालुक्यात ओळख होती.
  • पक्षाच्या पडत्या काळात आणि संघर्षाच्या दिवसांत त्यांनी शिवसेनेचा भगवा झेंडा तालुक्यात आणि गावात मजबुती ने धरून ठेवला होता.
  • त्यांच्या निधनामुळे सल्ले परिवारावर तसेच शिवसेना परि वारावर मोठी शोककळा पसरली आहे.
  • भोञा येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कारत्यांचे पा र्थिव भोञा या त्यांच्या मूळ गावी आणल्यानंतर अत्यंत शो काकुल वातावरणात त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.
  • या अंत्यविधी प्रसंगी भोञा ग्रामस्थ,सल्ले यांचे नातेवाईक, मित्रपरिवार तसेच राजकीय, सामाजिक आणि विविध क्षे त्रांतील मान्यवर, आजी-माजी लोकप्रतिनिधी मोठ्या सं ख्येने उपस्थित होते.
  • सर्वांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन त्यांना भावपूर्ण श्र द्धांजली अर्पण केली.
  • मोठा आप्तपरिवारते तुळजाभवानी मच्छीमार सहकारी संस्थेचे चेअरमन श्री.बालाजी सल्ले आणि श्री.सुनील भा ऊ सल्ले यांचे वडील होत.
  • त्यांच्या पश्चात पत्नी,विवाहित दोन मुले,सुना,नातवंडे, एक विवाहित मुलगी असा मोठा आणि सुशिक्षित आप्तपरि वार आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles