
अणुसरे येथील श्री सिद्धिविनायक विद्यालयातील ८ वी ते १० वीचे वर्ग बंद; पालक-ग्रामस्थांचा पंचायत समितीवर मोर्चा.
- प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- तालुक्यातील अणु सरे येथील श्री सिद्धिविनायक माध्यमिक विद्यालयातील इ यत्ता ८ वी ते १० वीचे वर्ग अचानक बंद पडल्याने विद्या र्थी, पालक आणि ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
- विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शाळा पूर्वव त सुरू करण्यात यावी,या मागणीसाठी पालक व ग्रामस्थां नी पंचायत समितीवर धडक देत सभापती नंदिनी कदम यांना निवेदन सादर केले.
- तसेच तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांनाही याबाबत निवेदने देण्यात आली आहेत.

- शैक्षणिक वर्ष २०२६-२७ सुरू होण्याच्या पहिल्याच दिव शी गावकऱ्यांना शाळेतील सर्व शिक्षकांच्या बदल्या झा ल्याची माहिती मिळाली.
- मात्र, त्यांच्या जागी अद्याप नवीन शिक्षकांची नियुक्ती कर ण्यात आलेली नाही.
- त्यामुळे इयत्ता ८ वी, ९ वी आणि १० वीच्या विद्यार्थ्यां स मोर शिक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून पालकां मध्येही अस्वस्थतेचे वातावरण आहे.
- सुमारे ३० वर्षांपूर्वी अणुसरे गावात मुलींच्या शिक्षणासाठी विशेष बाब म्हणून या माध्यमिक शाळेची स्थापना करण्या त आली होती.
- त्यावेळी गावाजवळ माध्यमिक शिक्षणाची सुविधा नस ल्याने अनेक मुलींना सातवीपर्यंत शिक्षण घेऊन पुढील शिक्षण अर्धवट सोडावे लागत होते.
- ग्रामस्थांच्या प्रयत्नातून सुरू झालेल्या या शाळेने गेल्या ती न दशकांत हजारो विद्यार्थ्यांना घडविले असून अनेक विद्यार्थी डॉक्टर, नर्स, अभियंते, वकील, शिक्षक, सरकारी अधिकारी, पोलीस अधिकारी, सैनिक तसेच विविध क्षेत्रां मध्ये उच्च पदांवर कार्यरत आहेत.
- शाळेचा दहावीचा निकालही अनेक वेळा शंभर टक्के ला गल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे.
- गावापासून पाच किलोमीटरच्या परिसरात दुसरी कोणती ही माध्यमिक शाळा उपलब्ध नसल्याने शाळा कायमस्व रूपी बंद झाल्यास विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होणार असल्याची भीती पालकांनी व्यक्त केली आहे.
- गावातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचाही प्रश्न गंभीर बनणार असल्याने शासनाने संवेदनशीलतेने निर्णय घ्या वा, अशी मागणी करण्यात आली आहे.
- विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात येऊ नये, यासाठी शासनाने तातडीने आवश्यक शिक्षकांची नियुक्ती करून अणुसरे येथील श्री सिद्धिविनायक माध्यमिक विद्यालया तील ८ वी ते १० वीचे वर्ग पूर्ववत सुरू करावेत, अशी मागणी ग्रामपंचायत, पालक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी केली आहे.
- यावेळी पंचायत समिती सदस्य प्रसाद मोहरकर, पंढरीना थ मयेकर आदी उपस्थित होते.
- यावेळी पालक श्रुती नंदकुमार गोलतकर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, “माझी मुलगी राजनंदि नी गोलतकर ही ९७ टक्के दिव्यांग असून तिला स्वतःहून चालता येत नाही.
- ती अणुसरे हायस्कूलमध्ये इयत्ता नववीत शिक्षण घेत आहे.
- मात्र शाळा अचानक बंद झाल्याने तिला दूरच्या शाळेत रोज ने-आण करणे आमच्या आर्थिक परिस्थितीत शक्य नाही. शाळा बंद होणार असल्याचे समजल्यापासून ती मानसिकदृष्ट्या खचली आहे.
- त्यामुळे अणुसरे येथील शाळा बंद करण्याचा प्रस्ताव ता त्काळ रद्द करून शाळा पूर्ववत सुरू करावी अशी कळ कळीची मागणी त्यांनी केली
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






