यमुनानगरच्या मॉडर्न इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी.

  • प्रतिनिधी : शिवाजी अंबिके :- यमुनानगर येथील पी.ई .एस.मॉडर्न प्री-प्रायमरी आणि प्रायमरी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये गुरुपौर्णिमेचा सण अत्यंत भक्तीमय आणि उ त्साही वातावरणात साजरा करण्यात आला.
  • या निमित्ताने गुरु-शिष्यांच्या पवित्र नात्याचा जागर करत शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या विशेष कार्यक्रमाचे पालक -शिक्षक संघाने आयोजन केले होते.
  • कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे चेअरमन माननीय श्री.वाय.आर.कुलकर्णी सर हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणू न पी.एम.पी ऑटोमेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतील टेक्निकल हेड माननीय श्री.नरेंद्र पेंडसे सर उपस्थित होते.
  • याप्रसंगी शाळेचे पूर्वप्राथमिक विभागाचे व्हिजीटर प्रा. डॉ.शशिकांत ढोले आणि प्राथमिक विभागाचे व्हिजीटर प्रा.डॉ.अतुल फाटक यांची देखील सन्माननीय उपस्थिती लाभली होती.
  • मान्यवरांच्या हस्ते माता सरस्वती आणि महर्षी व्यास यां च्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. या सोहळ्यात इ. ३ री व ४ थी च्या चिमुकल्या विद्यार्थ्यां नी आपल्या लाडक्या शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
  • आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे जीवनातील स्थान आणि त्यांनी दिलेले संस्कार यावर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांचे औक्षण करून त्यांचे आशीर्वा द घेतले.
  • प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शिक्षकांचा सत्कार करण्यात आ ला. प्रमुख पाहुणे श्री. नरेंद्र पेंडसे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “शिक्षक हे केवळ अक्ष रांचे ज्ञान देत नाहीत, तर विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य आकार देतात.”
  • तसेच त्यांनी शिक्षक आणि गुरु यांच्यातील फरक सुद्धा त्यांनी समजावून सांगितले.
  • अध्यक्षीय भाषणात चेअरमन श्री.वाय.आर.कुलकर्णी सर यांनी शाळेच्या प्रगतीचा गौरव करत शिक्षकांनी दिलेल्या संस्कारांचे महत्त्व अधोरेखित केले.
  • प्रा.डॉ.अतुल फाटक आणि प्रा.डॉ.शशिकांत ढोले यांनीही शिक्षकांच्या योगदानाचे कौतुक केले.
  • कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पालक – शिक्षक संघाच्या सदस्य सौ पूनम भोकरे आणि सौ.वर्धा फडके यांनी केले, तर आ भार प्रदर्शन सौ.प्रियंका अडागळे यांनी केले व कार्यक्रमा ची सांगता झाली.
  • या यशस्वी सोहळ्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.तृ प्ती वंजारे यांनी सदस्यांना योग्य मार्गदर्शन केले. सर्व शि क्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्र म घेतले.
  • संस्थेचे सहकार्यवाह प्रा.श्री.शामकांत देशमुख सर, शाळे चे व्हिजिटर प्रो.डॉ.अतुल फाटक सर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
  • संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ.गजानन एकबोटे व सहकार्यवाह प्रा.सौ. ज्योत्स्ना एकबोटे, उपकार्यवाह प्रा.निवेदिता एक बोटे यांनी मुलांचे व शिक्षकांचे गोड कौतुक केले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles