
भाजप अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर….! नवनिर्वाचित आमदार बसवराज पाटलांच्या सत्कारावरून आमदार राणा जगजितसिंह पाटलांना डावलले; ज्येष्ठ नेते व्यंकटराव गुंड यांचा घणाघाती आरोप.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- धाराशिव-लातूर-बी ड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भारतीय जन ता पार्टीचे नवनिर्वाचित आमदार बसवराज पाटील यांच्या सत्कार कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजपमधील अंतर्गत गटबाजी आणि तीव्र नाराजी उघडपणे चव्हाट्यावर आली आहे.
- या कार्यक्रमाच्या स्वागत पत्रिका आणि डिजिटल बॅनरव रून भाजपचेच धाराशिवचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना पूर्णपणे डावलण्यात आल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
- भाजपचे ज्येष्ठ नेते व्यंकटराव गुंड यांनी आमदार राणा पा टील यांच्यावर थेट आणि गंभीर आरोप करत पक्षांतर्गत वादाला तोंड फोडले आहे.

- बॅनरवरून आमदार राणा पाटील गायबआमदार बसवरा ज पाटील यांच्या भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयो जन करण्यात आले आहे.
- मात्र, या कार्यक्रमाच्या अधिकृत स्वागत पत्रिका आणि श हरात लावण्यात आलेल्या मोठ्या बॅनरवरून आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे नाव आणि फोटो गायब करण्यात आले आहेत.
- या कृतीमुळे भाजपमधील जुने विरुद्ध नवे असा वाद आ ता उघडपणे समोर आला असून, कार्यकर्त्यांमध्ये दोन उभे गट पडल्याचे चित्र आहे.
- राणा पाटलांना जुन्या, निष्ठावंतांची ऍलर्जी: व्यंकटराव गुं डया संपूर्ण प्रकरणावर भाजपचे ज्येष्ठ नेते व्यंकटराव गुंड यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे.
- माध्यमांशी बोलताना गुंड म्हणाले, “आमदार राणा जगजि तसिंह पाटील यांना जुन्या आणि निष्ठावंत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची प्रचंड ऍलर्जी आहे.
- त्यांनी यापूर्वी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जुन्या कार्य कर्त्यांना हेतू पुरस्पर उमेदवारी नाकारली होती.” गुंड यां च्या या थेट आरोपामुळे भाजपमधील अंतर्गत धुसफूस आता चव्हाट्यावर आली आहे.
- पक्षाध्यक्षांना डावलून पत्नीला बनवले झेडपी अध्यक्षरा णा पाटील यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र आक्षेप घेत व्यंकट राव गुंड यांनी जुन्या जखमांना पुन्हा उजाळा दिला.
- “आम्ही आमच्या मनातील तीव्र नाराजी आणि पक्षाचे नुक सान होत असल्याचा प्रकार यापूर्वीच वरिष्ठ पातळीवर प क्षाध्यक्षांच्या कानावर घातला आहे.
- परंतु, आमदार राणा पाटील यांनी पक्षाध्यक्षांच्या आदेशां ना आणि ज्येष्ठ नेत्यांना डावलून स्वतःच्या मनमानी कार भाराने आपल्या पत्नीला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष केले,” असा खळबळजनक आरोपही गुंड यांनी केला आहे.
- कारवाईची तयारी, पण विरोध कायम राहणार”राणा पाटी ल यांच्या हुकूमशाही आणि मनमानी कारभाराविरोधात आमची ही खदखद आणि संघर्ष यापुढेही असाच चालू राहणार आहे.
- आम्ही मांडलेली भूमिका पक्षाच्या हिताची आहे. यात जर आम्ही काही चुकीचे वागलो असू किंवा पक्षाची शिस्त मो डली असेल, तर पक्ष आमच्यावर नक्की कारवाई करेल.
- आम्ही त्या कारवाईला सामोरे जाण्यास तयार आहोत,” अ से खुले आव्हानच व्यंकटराव गुंड यांनी दिले आहे.
- नवनिर्वाचित आमदाराच्या सत्काराच्या आनंदाच्या वाताव रणात भाजपमधील ही मोठी अंतर्गत बंडखोरी आणि ना राजी नाट्य समोर आल्यामुळे धाराशिवच्या राजकीय पट लावर आगामी काळात याचे मोठे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
- वरिष्ठ पक्षश्रेष्ठी या वादावर काय पडदा टाकतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






