
कुदळवाडी ते घरकुल स्पाईन रोडवरील वाहतूक कोंडीबाबत मारुती जाधव यांचे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांना निवेदन; तातडीने दखल घेण्याच्या सूचना.
- प्रतिनीधी : पिंपरी-चिंचवड : नामदेव मेहेर :- कुदळवा डी चौक ते घरकुल चेरीज स्वीट चौक दरम्यानच्या स्पाईन रोड व सर्व्हिस रोडवर दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वाह तूक कोंडी, अनधिकृत पार्किंग, सार्वजनिक फुटपाथवरील संशयित अनधिकृत बांधकाम तसेच झाडतोडीच्या तक्रारीं ची तातडीने दखल घेऊन कारवाई करण्यात यावी.
- अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सामाजिक कार्यक र्ते मारुती गणपत जाधव यांनी उपमुख्यमंत्री तथा पुणे जि ल्ह्याच्या पालकमंत्री मा. सुनेत्राताई अजितदादा पवार यां च्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

- या निवेदनात कुदळवाडी चौक ते कृष्णानगर संविधान चौ क या स्पाईन रोडवरील सर्व्हिस रोड परिसरात मोठ्या प्र माणात अनधिकृत पार्किंग होत असल्याने स्थानिक नाग रिक, वाहनचालक आणि विविध गृहनिर्माण सोसायट्यां मधील रहिवाशांना दररोज गंभीर त्रासाला सामोरे जावे ला गत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
- डॉल्फिन विस्टा सोसायटीलगत असलेले स्टार बाजार, मॅ ट्रिक्स क्लासेस, मौर्य फोर हॉटेल, घरकुल चौकाच्या पुढी ल परिसरातील विविध व्यावसायिक आस्थापने, सूर्य हॉ स्पिटल तसेच कृष्णानगर पोलीस लाईनसमोरील बस पा र्किंगमुळे सर्व्हिस रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

- रस्त्यावर व प्रवेशमार्गांमध्ये वाहने उभी राहत असल्याने सोसायटीतील नागरिकांना सुरक्षितपणे ये-जा करणे कठी ण होत असल्याचेही जाधव यांनी निदर्शनास आणून दिले.
- कुदळवाडी ब्रिजच्या मुख्य चौकापासून घरकुल मुख्य चौ कापर्यंतचे सुमारे ३०० मीटर अंतर पार करण्यासाठी नाग रिकांना अनेकदा अर्धा ते पाऊण तास वाहतूक कोंडीत थांबावे लागत आहे.
- त्यामुळे नागरिकांचा वेळ व इंधन वाया जात असून दैनंदि न जीवनावर मोठा परिणाम होत आहे.

- तसेच, डॉल्फिन विस्टा सोसायटीलगत असलेल्या परिसरा त अनधिकृत पार्किंगचा विळखा वाढल्याने सर्व्हिस रोड ची वाहतूक व्यवस्था कोलमडत असल्याचे निवेदनात न मूद करण्यात आले आहे.
- सार्वजनिक फुटपाथवर उभारण्यात आलेल्या संशयित अ नधिकृत जिन्याची पाहणी करून त्याची परवानगी, मंजूर नकाशा व कायदेशीरतेची तपासणी करण्यात यावी, अशी ही मागणी करण्यात आली आहे.

- परिसरातील काही झाडांची आवश्यक परवानगीशिवाय छाटणी किंवा तोड करण्यात आल्याची नागरिकांची तक्रा र असून, याबाबत संबंधितांकडे परवानगीचे पुरावे मागित ल्यानंतर समाधानकारक माहिती मिळाली नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.
- त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर नियमानुसार कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

- वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिका, अग्निशमन दल व इतर आपत्कालीन सेवांना वेळेत पोहोचण्यात अडथळा निर्माण होण्याची शक्यता असल्याने ही बाब अत्यंत गंभीर अस ल्याचे मारुती जाधव यांनी निवेदनात नमूद केले आहे.
- सोसायटीमध्ये आग किंवा इतर कोणतीही दुर्घटना घड ल्यास आपत्कालीन वाहनांना प्रवेश मिळण्यात अडचण येऊ शकते, अशी भीतीही नागरिकांनी व्यक्त केली आहे.

- या संदर्भात उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रकरणाची तातडीने दखल घेऊन आवश्य क ती कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्याची मा हिती मिळाली आहे.
- दरम्यान, या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन वरिष्ठ पोली स निरीक्षक, चिखली वाहतूक विभाग तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चिखली पोलीस स्टेशन यांनाही स्वतंत्र निवेदने देण्यात आली आहेत.
- सर्व्हिस रोडवरील अनधिकृत पार्किंग हटवून वाहतूक सुर ळीत करावी, आपत्कालीन मार्ग खुला ठेवावा, आवश्यक त्या ठिकाणी ‘नो पार्किंग’ फलक लावावेत आणि संबंधि तांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी करण्या त आली आहे.

- यावेळी मारुती गणपत जाधव यांनी सांगितले की, “कुदळ वाडी चौक ते घरकुल परिसरातील वाहतूक कोंडी ही केव ळ दैनंदिन गैरसोय नसून नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित गंभीर समस्या आहे.
- प्रशासनाने तातडीने संयुक्त पाहणी करून अनधिकृत पा र्किंग व अतिक्रमणावर कारवाई करावी आणि नागरिकां ना कायमस्वरूपी दिलासा द्यावा.”
- — राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सामाजिक कार्यकर्ते मारुती गणपत जाधव यांच्या वतीने नागरिकांच्या प्रश्नासाठी पाठपुरावा सुरू.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






