सोलापूर आगारात माहिती अधिकार दिन मोठ्या उत्साहात साजरा.

  • प्रतिनीधी : सोलापूर : योगेश सुळे :- सोलापूर आगारा च्या वतीने माहिती अधिकार दिनाचे औचित्य साधून विशे ष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.हा कार्यक्रम अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला.
  • कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माहिती अधिकार कार्य कर्ता महासंघ, सोलापूर शहराचे उपाध्यक्ष श्री.अशोक बनसोडे उपस्थित होते.
  • आपल्या मार्गदर्शनात बोलताना श्री.बनसोडे यांनी माहिती अधिकार कायद्याचे महत्त्व,त्याचा नागरिकांना आणि प्रशा सनाला होणारा फायदा यावर सविस्तर प्रकाश टाकला.
  • “माहितीचा अधिकार हा लोकशाहीचा मजबूत स्तंभ असू न, यामुळे प्रशासनात पारदर्शकता आणि गतिमानता येण्यास मोठी मदत होते,” असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
  • या प्रसंगी सोलापूर आगाराचे वरिष्ठ आगार व्यवस्थापक श्री.जुंधळे साहेब आणि आगार व्यवस्थापक श्री.जाधव साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती.
  • दोन्ही अधिकाऱ्यांनी माहिती अधिकार कायद्याची अमल बजावणी सोलापूर आगारात कशा प्रकारे पारदर्शकपणे केली जाते, याविषयी मार्गदर्शन केले.
  • या कार्यक्रमाला सोलापूर आगारातील अधिकारी, चालक, वाहक आणि इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित हो ते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी सोलापूर आगाराचे आभार मानले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles