
आरोग्यमंत्री डॉ.तानाजीराव सावंत उद्या परंडा मतदारसंघातील गावांच्या दौऱ्यावर; नागरिकांनी उपस्थित राहण्याचे राहुल डोके यांचे आवाहन.
- प्रतिनीधी : फारूख शेख :- महाराष्ट्र राज्याचे मा.आरो ग्यमंत्री ना.डॉ.आमदार तानाजीराव सावंत उद्या, मंगळवार दिनांक १८ ऑगस्ट २०२६ रोजी परंडा मतदारसंघातील विविध गावांना भेटी देऊन जनतेशी संवाद साधणार आहेत.
- या ‘गाव भेट दौऱ्या’मध्ये परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य राहुल डोके यांनी केले आहे.

- या दौऱ्यात आरोग्यमंत्र्यांसोबत सभापती अर्चना अण्णा साहेब जाधव, जिल्हा परिषद सदस्य राहुल डोके, तानाजी कोलते, दिनकर खैरे यांसह परिसरातील प्रमुख पदाधिका री, लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
- या दौऱ्याच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांच्या अडीअड चणी जाणून घेतल्या जाणार आहेत.असा असेल आरोग्य मंत्र्यांचा दौरा:संध्याकाळी ६:०० वाजता: आधोरी येथे भेट व ग्रामस्थांशी संवाद.संध्याकाळी ८:०० वाजता: कुंभेफळ येथे भेट व चर्चा. संध्याकाळी ९:०० वाजता: साकत बु. येथे भेट व दौरा सांगता.
- हा दौरा स्थानिक पातळीवरील विकासकामे आणि नागरि कांच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
- तरी आधोरी, कुंभेफळ आणि साकत बु. परिसरातील सर्व आबालवृद्ध, तरुण आणि नागरिकांनी आपापल्या गावी वेळेवर उपस्थित राहून आपल्या समस्या मांडव्यात आणि दौऱ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन राहुल डोके यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






