
चुनाकोळवण गावच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी ग्रामविकास समितीचे चंदकांत पाटणकर बिनविरोध.
- प्रतिनीधी : राजापूर : प्रमोद तरळ :-तालुक्यातील मौजे चुनाकोळवण गावच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी ग्रामविकास समितीचे शिलेदार व ग्रामीण सभासद मा. श्री. चंद्रकांत पाटणकर साहेब यांची बुधवार, दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी बिनविरोध निवड झाली.
- सदर निवड प्रक्रियेचे प्रशासक म्हणून श्री.जयवंत भारती सर व माजी सरपंच श्री.श्रीकांत मटकर यांनी काम पाहि ले. तसेच गावप्रमुख श्री.तुळाजी मटकर व माजी तंटामु क्ती अध्यक्ष श्री.सुरेश गुरव यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

- चंद्रकांतजी पाटणकर याची तंटामुक्ती अध्यक्षपदी बिनवि रोध निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन हो त असून त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीस ग्रामविका स समिती चुनाकोळवण (मुंबई / ग्रामीण) यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
- चुनाकोळवण गावचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून यापू र्वी ग्रामविकास समितीचे सदस्य मा.श्री.सुरेशजी गोपाळ गुरव यांनी ही जबाबदारी अत्यंत यशस्वीपणे पार पाडली.
- त्यांच्या कार्यकाळात गावामध्ये संवाद, सलोखा व सामा जिक एकोपा टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी केलेले योगदान निश्चितच कौतुकास्पद आहे.
- त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल ग्रामविकास समिती व समस्त ग्रामस्थ यांनी त्यांचे आभार मानले.
- माजी अध्यक्ष श्री.सुरेश गुरव यांच्या कार्यपद्धतीचा आदर्श समोर ठेवून नवनियुक्त अध्यक्ष श्री.चंद्रकांत पाटणकर हे देखील गावामध्ये शांतता, सलोखा व सामाजिक एकोपा कायम ठेवण्यासाठी उत्तम कार्य करतील असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.
- तंटामुक्ती अध्यक्ष निवड प्रक्रियेस उपस्थित राहून सहकार्य करणारे सर्व ग्रामस्थ, गावप्रमुख, पदाधिकारी, सदस्य व उ पस्थित मान्यवर यांचेही ग्रामविकास समिती चुनाकोळव ण (मुंबई/ग्रामीण) यांच्यावतीने आभार मानण्यात आले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






