
रोकडे हनुमान मंदिराच्या सर्विस रस्त्याच्या अपूर्ण कामासाठी रुबाब पिंजारी यांचा पाठपुरावा.
- प्रतिनीधी : हर्षल ठाकरे :- आर्वी, ता.जि.धुळे येथील मुं बई–आग्रा राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या श्री क्षेत्र रोक डे हनुमान मंदिर देवस्थान परिसरातील सर्विस रस्त्याचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण करण्याच्या मागणीसाठी रुबाब पिंजारी यांनी पुढाकार घेतला आहे.
- मंदिर परिसरातील सर्विस रस्त्याचे काम अपूर्ण अवस्थेत असल्याने मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसह स्था निक नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे.

- विशेषतः वाहतूक, ये-जा तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने हा प्रश्न गंभीर बनला असून, संबंधित विभागाने याकडे तात डीने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
- या प्रश्नाच्या तातडीच्या सोडवणुकीसाठी रुबाब पिंजारी यांनी आज (दि. २५ ऑगस्ट २०२६) मुंबई येथील देवगिरी निवासस्थानी महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री मा.ना.सु नेत्रा ताई पवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर केले.
- यावेळी रोकडे हनुमान मंदिर देवस्थानच्या सर्विस रस्त्याचे उर्वरित काम तातडीने पूर्ण करून भाविक व नागरिकांची गैरसोय दूर करण्याची मागणी करण्यात आली.
- सदर रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणेला आवश्यक निर्देश देऊन प्रश्न मार्गी लावा वा, अशी विनंती रुबाब पिंजारी यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केली.
- “भाविक आणि स्थानिक नागरिकांची गैरसोय लक्षात घेता रोकडे हनुमान मंदिर परिसरातील सर्विस रस्त्याचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण होणे गरजेचे आहे.
- या प्रश्नासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करून काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील,” अशी भूमिका रुबाब पिंजारी यांनी व्यक्त केली.
- मागणी : श्री क्षेत्र रोकडे हनुमान मंदिर देवस्थानच्या सर्वि स रस्त्याचे उर्वरित अपूर्ण काम तातडीने पूर्ण करण्यात यावे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






