
ज्ञानरूपी वही-पुस्तकांची दहीहंडी….! मॉडर्न हायस्कुल यमुनानगर निगडी येथे दहीहंडी उत्सव उत्साहात संपन्न.
- प्रतिनीधी : निगडी : शिवाजी अंबिके :- मॉडर्न हायस्कु ल, यमुनानगर, निगडी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी चा सण अत्यंत अनोख्या आणि शैक्षणिक उपक्रमाच्या मा ध्यमातून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
- यावेळी आनंददायी शनिवारचे औचित्य साधून,दहीहंडीला एक वेगळा आणि सामाजिक संदेश देणारा पदर जोडत, शाळेत पारंपरिक दहीहंडीऐवजी ‘पुस्तक दहीहंडी’ चे आ योजन करण्यात आले होते.

- कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना सोनोने यांच्या हस्ते ‘पुस्तक दहीहंडी’चे भावपूर्ण पूजन करण्यात आले.
- यंदाच्या हंडीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यात नेहमीप्रमाणे लोणी, दही किंवा खाऊ बरोबरच पुस्तके, पेन्सिल, रबर, पेन यांसारखे विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी अत्यंत उपयुक्त असणारे शालेय साहित्य ठेवण्यात आले होते.

- ज्ञानाचा व संस्कारांचा हा अनोखा नजराणा मिळवण्यासा ठी चिमुकल्या बालगोपाळांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.
- यावेळी मुख्याध्यापिका वंदना सोनोने यांनी पुस्तके जीवन परिवर्तनाचे साधन यावर भाष्य करताना दहीहंडीचे अध्या त्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक महत्व सांगितले.
- पुस्तक दहीहंडी उपक्रमामुळे शालेय जीवनात एकता, बंधु ता, समानता व निरपेक्ष मित्रत्वाची भावना वाढते असे सांगितले.

- यावेळी श्रीकृष्णाच्या पारंपरिक आणि आकर्षक वेषात स जलेल्या विद्यार्थ्यांनी बासरीच्या सूरांवर व गोविंदाच्या ता लावर फेर धरला.
- उपस्थितांच्या टाळ्यांच्या आणि ‘गोविंदा आला रे’च्या गज रात श्रीकृष्णरूपी विद्यार्थ्यांनी ही आगळीवेगळी ‘पुस्तक दहीहंडी’ फोडली. हंडी फुटताच त्यातील शैक्षणिक साहि त्य पाहून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
- या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना सोनोने, पर्यवेक्ष क विजय पाचारणे, तसेच सांस्कृतिक समितीचे सदस्य आशा कुंजीर, साधना राऊत, जयश्री चव्हाण, उमा बिर्जे, उमर शेख, गंगाधर सोनवणे, शिवाजी अंबिके आणि पाल क संघाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- उपक्रमाचे कौतुक संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.गजानन एक बोटे,कार्यवाह शामकांत देशमुख, सहकार्यवाह प्रा.डॉ. ज्यो त्स्ना एकबोटे, उपकार्यवाह प्रा. डॉ. निवेदिता एकबोटे, शा ळा समिती अध्यक्ष मानसिंग साळुंके, व्हिजिटर प्रमोद शिं दे आणि राजीव कुटे यांनी केले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






