बार्शीत डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू; सोलापूरच्या अश्विनी रुग्णालयात उपचारादरम्यान तोडली प्राणज्योत, नातेवाईकांचा गुन्हा दाखल करण्याचा पोलिसात केला अर्ज.

  • प्रतिनिधी : फारूक शेख :- बार्शी येथे दवाखा ण्यात डॉ यादव हर्नियाच्या ऑपरेशनदरम्यान डॉक्टरांनी दाखवले ल्या निष्काळजीपणामुळे आणि चुकीच्या उपचारामुळे ६० वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाल्याचा खळबळजनक आरोप नातेवाईकांनी केला आहे.
  • याप्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात डॉ.व्ही.एस.यादव व इतरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात या वा, अशी मागणी करणारा लेखी अर्ज मृत रुग्णाच्या मुली ने पोलिसांकडे सादर केला आहे.
  • मिळालेल्या माहितीनुसार, हंबीरराव नामदेव साबळे (वय ६०, रा. डोमगाव, ता.परांडा, जि.धाराशिव) असे मृत रुग्णा चे नाव आहे.
  • याप्रकरणी त्यांची मुलगी सारिका गुरुदास पाटील (रा. देव गाव (भु), ता. परांडा) यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे तक्रार अर्ज दिला आहे.
  • तक्रार अर्जात नमूद केल्यानुसार, हंबीरराव साबळे यांना हर्नियाच्या त्रासामुळे सोमवार, दिनांक १० ऑगस्ट २०२६ रोजी बार्शी येथील यादव हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
  • तेथे डॉ.व्ही.एस.यादव यांनी त्यांच्यावर हर्नियाची शस्त्रक्रि या (ऑपरेशन) केली. मात्र, ऑपरेशननंतर हंबीरराव यांची प्रकृती अत्यंत गंभीर झाली.
  • त्यानंतर पुढील तपासणीसाठी (सीटी स्कॅन) त्यांना जगदा ळे मामा हॉस्पिटल येथे हलवण्यात आले.
  • दरम्यान, १३ ऑगस्ट रोजी प्रकृती अधिक बिघडल्याने डॉ. यादव, डॉ.पोकळे आणि डॉ.मोराळे यांनी रुग्णाच्या पोटाचे पुन्हा ऑपरेशन केले.
  • हर्नियाच्या पहिल्या ऑपरेशनवेळी आतड्याला छिद्र पड ल्याचे डॉक्टरांनी नातेवाईकांना सांगितले व त्यामुळे हे दुसरे ऑपरेशन करण्यात आले.
  • या दुसऱ्या शस्त्रक्रियेनंतरही रुग्णाच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही, उलट ती आणखी खालावत गेली.
  • त्यामुळे नातेवाईकांनी १७ ऑगस्ट रोजी हंबीरराव यांना तातडीने सोलापूर येथील अश्विनी हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी दाखल केले.
  • मात्र, तेथे उपचार सुरू असतानाच १९ ऑगस्ट २०२६ रो जी त्यांची प्राणज्योत मालवली. डॉक्टरांच्या हलगर्जीपणा मुळे आणि चुकीच्या पद्धतीच्या शस्त्रक्रियेमुळेच आपल्या वडिलांचा नाहक बळी गेला आहे, असा थेट आरोप मुलगी सारिका पाटील यांनी केला आहे.
  • या गंभीर निष्काळजीपणाची दखल घेऊन संबंधित डॉक्ट रांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी माग णी त्यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.
  • याप्रकरणी बार्शी शहर पोलीस आता काय पावले उचलता त, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles