परंडा तहसील कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यावर अमानुष हल्ला; आरोपीला जिल्हा हद्दपार करा, अन्यथा कामबंद आंदोलन..!

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :-परंडा तहसील कार्या लयातील महिला महसूल सेवक नूरबानो सुलतान शेख यां च्यावर शासकीय कर्तव्य बजावत असताना एका दलाला ने अमानुषपणे मारहाण आणि दमदाटी केल्याची धक्का दायक घटना घडली आहे.
  • या घटनेमुळे संपूर्ण महसूल कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संतापा ची लाट उसळली असून, गुंड प्रवृत्तीच्या आरोपीला तात्का ळ अटक करून जिल्हा हद्दपार करावे, अन्यथा तीव्र काम बंद आंदोलन छेडण्याचा इशारा महसूल सेवक संघटनेने प्रशासनाला दिला आहे.
  • याबाबत जिल्हाधिकारी धाराशिव, उपविभागीय अधिका री भूम, तहसीलदार परंडा आणि परंडा पोलीस निरीक्षकां ना निवेदन सादर करण्यात आले आहे.
  • मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार दिनांक ०१ सप्टेंबर २०२६ रोजी महिला महसूल सेवक नूरबानो शेख या तह सीलदार यांच्या आदेशानुसार शासकीय टपाल देऊन रेकॉर्ड रूममध्ये आपले कार्यालयीन काम करत होत्या.
  • याच दरम्यान, तहसील कार्यालयात बेकायदेशीरपणे दला लीचे काम करणारा रोसा येथील रहिवासी जरीचंद साहेब राव गोडगे हा रेकॉर्ड रूममध्ये घुसला.
  • त्याने नूरबानो शेख यांना अत्यंत हीन दर्जाची वागणूक दे त शासकीय कामात अडथळा आणला, दमदाटी केली आ णि त्यांना अमानुषपणे मारहाण केली.
  • कार्यालयात दहशत, कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण संबंधित आरोपी जरीचंद गोडगे हा सराईत गुंड प्रवृत्तीचा असून, यापूर्वीही त्याने तहसील कार्यालयातील कर्मचारी खूने यांना देखील अशाच प्रकारे मारहाण केली होती.
  • आरोपीच्या या सततच्या दादागिरीमुळे आणि गुंडगिरीमुळे परंडा तहसील कार्यालयात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
  • कार्यालयात महिला कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास ४० टक्के असून, अशा असुरक्षित वातावरणात शासकीय का म कसे करावे, असा संतप्त सवाल कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे.
  • तातडीने कारवाईची मागणीमहसूल सेवक संघटनेने निवे दनाद्वारे मागणी केली आहे की, आरोपी जरीचंद गोडगे याच्यावर आतापर्यंत दाखल असलेल्या गुन्ह्यांची सखोल चौकशी व्हावी.
  • महिला कर्मचाऱ्यांवरील अत्याचार आणि शासकीय कामा तील अडथळा लक्षात घेऊन त्याला तात्काळ अटक करा वी आणि त्याची जिल्ह्यातून हद्दपारी (तडीपारी) करण्यात यावी.
  • जर आरोपीवर कठोर कायदेशीर कारवाई झाली नाही, तर सर्व कर्मचारी शासकीय काम बंद करून आंदोलनाचे हत्यार उपसतील, असा इशारा महसूल सेवक संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
  •  या निवेदनावर समाधान ढोरे बोधन सस्पटे नामदेव अव  सरे दादासाहेब पुरी प्रशांत गवळी कर्तुजा राऊत दीपक वरगले मरतेस चव्हाण गोमाशी प्रल्हाद कदम बाळनाथ महेंद्र शिंदे कैलास पवार अशोक गोडगे धनंजय अवसरे ज्योती चोतमहाल रेखा काळे सविता काळे इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles