मॉडर्न हायस्कूल निगडी येथे घनकचरा व्यवस्थापन जनजागृती कार्यक्रम संपन्न.

  • प्रतिनिधी : शिवाजी अंबिके :- पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्यावतीने जनजागृती साठी घनकचरा व्यवस्थापन कार्यक्रमाची अंमलबजावणी नुकतीच मॉडर्न हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय यमुनानगर, निगडी येथे यशस्वीपणे करण्यात आली.
  • शासनाच्या “महाराष्ट्र स्वच्छता अभियान” अंतर्गत तसेच स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) 2.0 मधील “एकच ल क्ष शहरे स्वच्छ” या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये कचऱ्याचे वर्गीकरण, विल्हेवाट आणि योग्य व्यवस्थापनाबाबत जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
  • या कार्यक्रमात पीसीएमसी (PCMC) मार्गदर्शिका प्राज क्ता चौगुले यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून मार्गदर्शन केले.
  • कचरा व्यवस्थापनात अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या 8R संकल्पना — Reuse, Refuse, Reduce, Rethink, Recycle, Refurbish, Remanufacture आणि Repair — त्यांनी अत्यंत सोप्या आणि रंजक पद्धतीने विद्यार्थ्यांना समजावून सांगितल्या.
  • कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत अत्यंत सक्रिय सहभाग नोंदवला. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन आरोग्य समिती प्रमुख अमृता गायकवाड यांनी केले.
  • तसेच या उपक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना सोनोने व पर्यवेक्षक पाचारणे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
  • या जनजागृती कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता आ णि पर्यावरण संवर्धनाबद्दल नवी चेतना निर्माण झाली आहे.
  • उपक्रमाचे कौतुक संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.गजानन एक बोटे,कार्यवाह प्रा.शामकांत देशमुख,सहकार्यवाह प्रा.डॉ. ज्योत्स्ना एकबोटे,उपकार्यवाह प्रा.डॉ.निवेदिता एकबोटे, शाळा समिती अध्यक्ष प्रा.मानसिंग साळुंके,व्हिजिटर प्रमो द शिंदे,सदस्य राजीव कुटे यांनी केले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles