
अहेरीत गोकुळाष्टमी निमित्त भव्य दहीहंडी स्पर्धा उत्साहात; गोंडवाना सी.सी. गोविंदा पथक व्यंकटरावपेठा ठरले विजेते; ५१ हजारांचे पारितोषिक व मानचिन्ह पटकावले.
- प्रतिनीधी : स्वरूप गावडे :- अहेरी, दि.५ सप्टेंबर २०२६ : गोकुळाष्टमी व विश्व हिंदू परिषद स्थापना दिनाचे औचि त्य साधून बजरंग दल तथा श्रीराम जन्मोत्सव समिती अहे री आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव समिती अहेरी यांच्या संयुक्त विद्यमाने अहेरी येथे भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोज न करण्यात आले.
- उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात झालेल्या या स्प र्धेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

- कार्यक्रमाचे उद्घाटन व विशेष अतिथी म्हणून मा.हर्षवर्धन बाबा आत्राम माजी सदस्य, पंचायत समिती अहेरी उप स्थित होते.
- प्रमुख वक्ते म्हणून विनयजी मडावी, पूर्व चंद्रपूर विभाग ब जरंग दल संयोजक तसेच श्री.सदाशिवजी माकडे, जिल्हा मंत्री, विश्व हिंदू परिषद यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
- भगवान श्रीकृष्ण यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
- यावेळी उपस्थित मान्यवरांनी गोकुळाष्टमी, श्रीकृष्ण जन्मो त्सव तसेच विश्व हिंदू परिषद स्थापना दिनाचे महत्त्व सांग त उपस्थितांना मार्गदर्शन केले.
- मान्यवरांचा आयोजकांच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. दहीहंडी स्पर्धेत एकूण चार गोविं दा पथकांनी सहभाग घेतला.
- यामध्ये व्यंकटरावपेठा येथील दोन पथके तसेच अबनप ल्ली आणि अहेरी येथील गोविंदा पथकांचा समावेश होता.
- गोविंदा पथकांनी थरावर थर रचत दहीहंडी फोडण्यासाठी केलेल्या चित्तथरारक प्रयत्नांनी उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण केले.
- या स्पर्धेत गोंडवाना सी.सी. गोविंदा पथक, व्यंकटरावपेठा यांनी अवघ्या ५.८० सेकंदांत दहीहंडी फोडत प्रथम क्रमां क पटकावला. विजेत्या पथकाला ५१ हजार रुपये रोख पारितोषिक व शिल्ड देऊन गौरविण्यात आले.
- या दहीहंडी स्पर्धेसाठीचे ५१ हजार रुपयांचे पारितोषिक मा.डॉ.राजे धर्मराव बाबा आत्राम, माजी मंत्री तथा आमदा र, अहेरी विधानसभा क्षेत्र यांच्या वतीने देण्यात आले.
- कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सचिन येरोजवार यांनी केले. त्यांच्या सूत्रसंचालनामुळे कार्यक्रमा ला उत्साहपूर्ण रंगत आली.
- कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी देवेंद्र खतवार, आदित्यराव जक्कोजवार, श्रीकांत गद्देवार, प्रणित श्रीरामवार, पंकज आईंचवार, राहुल आत्राम, स्वप्नील सल्लावार, अक्षय संतो षवार, सोनू पुरोहित, शंकर दंडकीवार, कृष्णा गुप्ता, प्रथम आईंचवार यांच्यासह बजरंग दल, श्रीराम जन्मोत्सव समि ती व श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव समितीचे स्वयंसेवक आ णि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






