
माझा मुलगा लाल दिव्याच्या गाडीत यायच्या ऐवजी आंबोलीस मध्ये आला माझे स्वप्न अपुरे राहिले प्रथमेश ची आई.
- प्रतिनीधी : परंडा : फारूख शेख :- समीर ओव्हाळ पु ण्यात एम.पी. एस.सी ची (MPSC) तयारी करणाऱ्या धा राशिव जिल्ह्या तील परंडा तालुक्यातील खासापूरी येथील एका होतकरू तरुणानं टोकाचं पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपवली आहे.
- प्रथमेश दिलीप देशमुख (वय २६) असं या दुर्दैवी तरुणाचं नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण परंडा तालुक्यासह राज्य भरातून हळहळ व्यक्त होत आहे.

- नेमकी पार्श्वभूमी आणि संघर्ष:
प्रथमेश गेल्या चार वर्षांपासून पुणे येथे राहून अत्यंत प्रति कूल परिस्थितीत एमपीएससीची तयारी करत होता. - घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे त्याचे दाजी त्याला दरमहा ८ ते १० हजार रुपये पाठवायचे, त्यातून तो टिवी शन खाने पीने व् शिक्षण घेत होता.
- कौटुंबिक आर्थिक अडचणींमुळे त्याला अनेकदा उपाशी पोटी किंवा एका वेळच्या जेवणावर दिवस काढावे लागत होते. त्याच्या डोक्यावर दोन-अडीच लाखांचे कर्ज आणि उधारी झाली होती.
- ग्रामीण भागातील एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलाला केवळ एवढ्याशा कर्जासाठी व रोजगाराच्या अभावामुळे टोकाचे पाऊल उचलावे लागल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.
- “लाल दिव्याच्या गाडीत येणार होता,पण…” प्रथमेश च्या निधनानंतर त्याच्या आईचा व कुटुंबाचा टाहो काळीज पिळवटून टाकणारा आहे.
- “माझा मुलगा अधिकारी होऊन लाल दिव्याच्या गाडीत घरी येणार होता, पण तो थेट अँबुलन्समध्ये आला,” अशी हंबरडा फोडत आईने दिलेली प्रतिक्रिया उपस्थितांचे डोlळे पाणावणारी ठरली.
- त्याच्या पश्चात आई आणि पाच बहिणी असा परिवार असून, वडिलांचे छत्र আগেই हरपले होते.
- अभिजीत दीपके यांच्याकडून सांत्वन व आंदोलनाचा इशारा:
- घटनेची माहिती समजताच CJP चे अभिजीत दीपके यां नी खासापूर येथे जाऊन प्रथमेशच्या कुटुंबीयांची भेट घेत ली आणि त्यांचे सांत्वन केले. कुटुंबीयांच्या व्यथा ऐकून अभिजीत दीपके देखील भावूक झाले.
- प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी, “हा व्यवस्थेने घेतलेला बळी आहे,” असा गंभीर आरोप केला.
- तसेच ग्रामीण भागातील तरुणांवर बेरोजगारीची वेळ आणणाऱ्या आणि स्पर्धा परीक्षांच्या गोंधळाला जबाबदार असलेल्या या परिस्थितीविरोधात संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली आहे.
- यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रणजीत पा टील रविराज साबळे यांनीही देशमुख कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले आहे. परंडा पोलीस स्टेशनचे पीआय यांनी चोक बंदोबस्त ठेवला होता.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






