
भोत्रा ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराच्या आरोपांवर कारवाई न झाल्यास १७ सप्टेंबरला आत्मदहनाचा इशारा; परंडा प्रशासनात खळबळ.
- प्रतिनीधी : परंडा : फारूक शेख :- मौजे भोत्रा ग्रामपं चायतच्या तत्कालीन ग्रामसेवक रोहिणी सातपुते यांच्या वर भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून शासकीय कारवाई करण्याच्या मागणीसा ठी भोत्रा येथील रहिवासी दत्तात्रय सुभाष गोळे यांनी प्र शासनाला आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
- गोळे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, १७ सप्टेंबर २०२६ प र्यंत ठोस कारवाई न झाल्यास परंडा पंचायत समिती का र्यालयासमोर ते आपल्या जीवनाचा अंत करणार असल्या चे म्हटले आहे.

- या इशाऱ्यामुळे धाराशिव जिल्ह्याच्या प्रशासकीय वर्तुळा त खळबळ उडाली आहे.
- मुख्यमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत निवेदने:
- या प्रकरणी गोळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामवि कास मंत्री जयकुमार गोरे, पालकमंत्री प्रताप सरनाईक,वि भागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर,जिल्हाधिकारी धारा शिव, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.धाराशिव, पोलीस अधीक्षक, तहसीलदार परंडा व गटविकास अधिकारी परं डा यांना लेखी निवेदने पाठवली आहेत.
- त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी यापूर्वी १५ जुलै २०२६ रो जी आमरण उपोषणाचे आणि २ सप्टेंबर २०२६ रोजी कारवाईसाठी अर्ज दिला होता.
- १५ दिवसांहून अधिक काळ उलटूनही कारवाई झाली न सल्याने हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. गोळे यांना न्याय मिळनार का ? आन्याय होणा र तालुक्याचे लक्ष लागले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






