जवळेथर येथे ‘गणपती सजावट स्पर्धा २०२६’ चे आयोजन, ‘श्री गांगो रवळनाथ प्रसन्न’ फेसबुक पेजचा पुढाकार. 

  • प्रतिनीधी : जवळेथर : प्रमोद तरळ :- गणेशोत्सवाचे औ चित्य साधून राजापूर तालुक्यातील जवळेथर गावाती ल कलागुणांना वाव देण्यासाठी आणि ग्रामस्थांमधील कौ टुंबिक संस्कृतीचा गौरव करण्यासाठी ‘श्री गांगो रवळनाथ प्रसन्न’ (अधिकृत फेसबुक पेज) यांच्या वतीने ‘जवळेथर गणेशोत्सव २०२६ – गणपती सजावट स्पर्धा’ चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा केवळ जवळेथर गावातील मूळ ग्रामस्थांसाठी मर्यादित असणार आहे.
  • स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ग्रामस्थांनी आपापल्या घरा तील श्री गणेशाच्या मनमोहक सजावटीचे २ ते ३ स्पष्ट (Clear High Quality) फोटो आणि एक लहान (१५ ते ३० सेकंदांचा) व्हिडिओ १४ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर २० २६ रोजी संध्याकाळी ६:०० वाजेपर्यंत पाठवायचे आहेत.
  • प्रवेशिका पाठवण्यासाठी आयोजकांच्या ‘श्री गांगो रवळ नाथ प्रसन्न’ या अधिकृत फेसबुक पेजवर DM (Direct Message) करावा किंवा ९३५९२३४६४३ या व्हॉट्स ॲप क्रमांकावर पाठवावा.
  • फोटो पाठवताना स्पर्धकाचे पूर्ण नाव, वाडीचे नाव आणि मोबाईल नंबर नमूद करणे बंधनकारक आहे.
  • स्पर्धेचे नियम व वैशिष्ट्ये: १. एका घरगुती गणपतीसाठी एकच प्रवेशिका ग्राह्य धरली जाईल.
  • २. नैसर्गिक व पर्याव रणपूरक (Eco-Friendly) साहित्याचा (उदा. फुले, काग द, कापड, माती, झाडांची पाने) वापर केलेल्या सजावटीस विशेष गुण दिले जातील.
  • ३.थर्माकोल किंवा प्लास्टिकचा अतिवापर टाळणाऱ्या सजावटीला प्राधान्य दिले जाईल.
  • ४. सजावटीतील कल्पकता आणि संकल्पना (Creativit y & Theme) यावर आधारित गुणदान केले जाईल.
  • ५ परीक्षकांचा निर्णय अंतिम आणि सर्व स्पर्धकांवर बंधनकारक राहील.
  • आकर्षक पारितोषिके:
  • स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी सन्मानचिन्ह तसेच ५ उत्तेजनार्थ आकर्षक सन्मानचिन्हे देऊन गौरविण्यात येईल. विजेत्यांची नावे गौरी विसर्जन दिवशी फेसबुक पेजवर जाहीर केली जातील.
  • जवळेथर गावातील सर्व ग्रामस्थांनी आपल्या घरातील सजावटीचे फोटो पाठवून या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
  • अधिक माहिती व प्रवेशिकेसाठी https://www.facebook.com/share/1Dr7cGRSUT/ या अधिकृत फेसबुक पेजला भेट द्यावी.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles