
अल्लाहकडे केलेली दुवा झाली कबूल, परंड्यात नमाजानंतर वरुणराजाची जोरदार हजेरी…! मुक्या प्राण्यांच्या आणि शेतकऱ्यांचे व नागरीकाचे झाले समाधान.
- प्रतिनिधी : फारुख शेख :- परंडा तालुक्यात पावसाने दीर्घकाळ दडी मारल्यामुळे दुष्काळसदृश गंभीर परिस्थि ती निर्माण झाली होती. पाऊस नसल्याने तालुक्यातील शेतकरी, पशुधन आणि सर्वसामान्य नागरिक कमालीचे चिंतेत होते.
- या संकटातून सुटका व्हावी आणि लवकरात लवकर पाऊ स पडावा यासाठी परडा येथील मुस्लिम बांधवांनी शुक्रवा री विशेष नमाज अदा करून अल्लाहकडे आर्त दुवा केली होती.

- ही दुवा अखेर कबूल झाली असून, रविवारी दुपारी परंडा शहरासह परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
- तालुक्यातील पावसाची चिंता मिटावी आणि विशेषतः मु क्या प्राण्यांना चारा-पाणी मिळावे, या भावनेने शुक्रवारी एका विशेष सामूहिक नमाज पठणाचे आयोजन करण्यात आले होते.
- शहराबाहेरील हजरत खाजा बदरुद्दीन दर्गा परिसरातील मैदानावर शुक्रवारी दुपारी ठीक ३ वाजता हाफिज मलिक यांच्या नेतृत्वाखाली ही नमाज अदा करण्यात आली.
- तालुक्यावर आलेले हे नैसर्गिक संकट दूर व्हावे यासाठी संपूर्ण परंडा शहरातून अत्यंत मोठ्या संख्येने मुस्लिम बां धव या मैदानावर एकत्र आले होते.
- सर्वांनी मिळून अत्यंत भावूक अंतःकरणाने पावसासाठी अल्लाहकडे साकडे घातले. मुस्लिम बांधवांची ही सामूहि क प्रार्थना आणि मुक्या प्राण्यांसाठी केलेली दुवा अखेर फळास आली.
- नमाज पठण झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच, म्हणजे च रविवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास परंडा येथे ढगांच्या गडगडाटासह पावसाने जोरदार एन्ट्री केली.

- या मुसळधार पावसामुळे करपून चाललेल्या पिकांना जी वदान मिळाले असून, बळीराजासह सर्वसामान्य नागरिकां मध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
- निसर्गाने दिलेल्या या दिलाशामुळे नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला असून, सर्व स्तरांतून समाधान व्यक्त होत आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






