
महावितरणकडून परंडा तालुक्यात स्मार्ट मीटरच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक; चौकशी करून दोषींवर कारवाईसाठी माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी थेट मुख्यमंत्र्यांना निवेदन.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- महावितरण कंपनी च्या उपविभागीय कार्यकारी अभियंत्यांकडून परंडा तालु क्यात ग्राहकांची कोणतीही संमती न घेता जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
- नवीन मीटर बसवताना जुन्या मीटरचे अंतिम रीडिंग रेकॉ र्डवर न ठेवता ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फस वणूक केली जात असल्याचा आरोप करत, माहिती अधि कार कार्यकर्ते आणि नागरिकांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फड णवीस, जिल्हाधिकारी आणि महावितरणच्या वरिष्ठ अधि काऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार केली आहे.

- या गंभीर प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषी अधि काऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
- मिळालेल्या माहितीनुसार, महावितरण कंपनीने परंडा ता लुक्यात स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम सुरू केली आहे.
- मात्र, ही मोहीम राबवताना वीज ग्राहकांना विश्वासात घेत ले जात नाही. ग्राहकांची रीतसर संमती न घेता आणि त्यां ना पूर्वकल्पना न देताच हे मीटर लावले जात आहेत.
- सर्वात गंभीर बाब म्हणजे, जुने मीटर काढताना त्यावरील वीज वापराचे रीडिंग (Record) कुठेही नोंदवले जात ना ही किंवा त्याचा कोणताही अधिकृत पुरावा ग्राहकांना दिला जात नाही.
- यामुळे जुन्या मीटरचे नेमके बिल किती आणि नवीन मी टरची सुरुवात कुठून, याबाबत मोठा गोंधळ निर्माण झाला असून महावितरणकडून ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याचा संताप नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
- या मनमानी कारभाराविरोधात परंडा येथील माहिती अधि कार कार्यकर्ते आणि सजग नागरिकांनी एकत्र येत स्वाक्ष री मोहीम राबवून प्रशासनाला धारेवर धरले आहे.
- या संदर्भात मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, मा.श्री मती मेघना दीपक साकोरे मॅडम, श्रीमती आभा शुक्ला मॅ डम, मा.जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव, मा.मुख्य का र्यकारी अभियंता महावितरण कंपनी धाराशिव आणि मा. तहसीलदार तहसील कार्यालय परंडा यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले आहे.
- तक्रारदारांनी निवेदनात म्हटले आहे की, स्मार्ट मीटरच्या नावाखाली सुरू असलेला हा कारभार सर्वसामान्य ग्राह कांच्या खिशावर दरोडा टाकणारा आहे.
- जुन्या मीटरचे रीडिंग गायब करून ग्राहकांना अवाजवी बि ले पाठवण्याचा हा कट असून, या संपूर्ण प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी झाली पाहिजे.
- तसेच बेकायदेशीरपणे आणि पारदर्शकता न ठेवता व ला ईट बिले न वाटता आसे काम करणाऱ्या उपविभागीय का र्यकारी अभियंत्यांवर आणि संबंधित कर्मचाऱ्यांवर व ठेके दारावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अ न्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही आं दोलक व कार्यकर्त्यांनी दिला आहे.
- या निवेदनावर तालुक्यातील अनेक प्रमुख माहिती अधि कार कार्यकर्ते यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
- फारुक शेख, जमीर शिकलकर, शिवाजी करळे, विजय मे हर,कानिफनाथ सरपने, अमित आगरकर, असलम पल्ला, अलीम शिकलकर, मुलांनी, किशोर येवारे, आयूब जीनेरी, इत्यादींच्या उपस्थित होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






