
सोलापूर-पुणे मार्गावर ‘शिवाई’ ई-बसचे चार्जिंग संपून भररस्त्यात ब्रेकडाऊन; कंत्राटदार आणि एसटी प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात प्रवाशांचा संताप.
- प्रतिनीधी : सोलापूर : योगेश सुळे :- एस.टी महामंडळा च्या सोलापूर आगाराकडून चालवल्या जाणाऱ्या सोलापूर – पुणे ‘शिवाई’ इलेक्ट्रिक बसच्या (गाडी क्र. MH 12 VF 4035) ढिसाळ आणि अकार्यक्षम कारभाराचा फटका पुन्हा एकदा प्रवाशांना बसला आहे.
- दिनांक २४ सप्टेंबर २०२६ रोजी सोलापूरहून पुण्याकडे निघालेली ही बस पूर्ण चार्ज न करताच मार्गावर सोडल्यामुळे भिगवण येथे पोहोचताच तिचे चार्जिंग संपले आणि गाडी भररस्त्यात बंद पडली.
- या निष्काळजीपणामुळे बसमधील ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांसह सर्व प्रवाशांना तीव्र उकाड्यात तासनता स ताटकळत राहावे लागले.

- घटनेचा तपशील व प्रवाशांचे हाल:
- मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर आगारातून सुटलेली सदर शिवाई बस आवश्यकतेनुसार पूर्ण चार्ज (100%) न करताच प्रवाशांना घेऊन पुण्याकडे रवाना करण्यात आली होती.
- बस भिगवण परिसरात आली असता गाडीचे चार्जिंग पूर्णपणे संपले आणि गाडी रस्त्यातच ठप्प झाली.
- तांत्रिक अडचण नसताना केवळ अपूर्ण चार्जिंगमुळे हा प्रकार घडल्याने संतप्त प्रवाशांनी एसटी प्रशासनाच्या कारभारावर जोरदार ताशेरे ओढले.
- वेळेवर पर्यायी व्यवस्था न मिळाल्याने अनेक प्रवाशांचे नियोजित कार्यक्रम, कार्यालयाचे काम आणि पुढील प्रवास खोळंबला.
- खाजगी कंत्राटदार आणि प्रशासनावर संशय:
- सदर ई-बस ही खाजगी कंत्राटदाराची (भाडेतत्त्वावरील) असून कंत्राटदाराकडून गाड्यांची वेळेवर दुरुस्ती, चार्जिंग ची खात्री व तांत्रिक देखभाल केली जात नाही, असा आ रोप प्रवाशांनी केला आहे.
- वारंवार अशा घटना घडत असतानाही सोलापूर विभागा तील वरिष्ठ अधिकारी संबंधित खाजगी कंत्राटदारावर कोणतीही ठोस दंडात्मक कारवाई करत नाहीत.
- त्यामुळे एसटी महामंडळाचे अधिकारी आणि खाजगी कं त्राटदार यांच्यात आर्थिक संगनमत आहे का, असा गंभीर संशय प्रवाशांकडून व्यक्त केला जात आहे.
- प्रवाशांच्या मुख्य मागण्या:
- १. दिनांक २४/०९/२०२६ रोजी घडलेल्या या घटनेची एस.टी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत सखोल चौकशी करण्यात यावी.
- २. प्रवाशांच्या जीवाशी आणि वेळेशी खेळ करणाऱ्या सो लापूर आगाराचे आगार व्यवस्थापक (Depot Manag er), संबंधित चार्जिंग इन्चार्ज आणि खाजगी कंत्राटदार कंपनीवर तात्काळ कडक प्रशासकीय व दंडात्मक कार वाई व्हावी.
- ३. १००% चार्जिंग असल्याशिवाय कोणतीही ‘शिवाई’ ब स आगारातून बाहेर सोडली जाणार नाही, असा कडक नियम लागू करावा.
- ४. तांत्रिकदृष्ट्या नादुरुस्त आणि अपूर्ण सेवा देणाऱ्या कं त्राटदाराचा करार तात्काळ रद्द करण्यात यावा.
- प्रवासी व जनतेचा आंदोलनाचा इशारा:
- याप्रकरणी सोलापूर विभागीय नियंत्रकांकडे अधिकृत त क्रार दाखल करण्यात आली असून, महामंडळाने यावर तात्काळ कठोर कारवाई करून अहवाल जाहीर करावा.
- अन्यथा, या गंभीर गैरकारभाराविरोधात प्रवासी संघटना, प्रसारमाध्यमे आणि रस्त्यावरील आंदोलनाच्या माध्यमातू न तीव्र लढा उभारला जाईल, असा इशारा बाधित प्रवाशां नी दिला आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






