त्याचे तोंडही पाहण्याची इच्छा नसते, ती प्रवृत्तीच वाईट!” मुख्यमंत्र्यांच्या गाडीतील प्रवासानंतर खासदार ओमराजे निंबाळकरांचा आमदार राणा जगजितसिंहांवर घणाघात.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक :- धाराशिव जिल्ह्याच्या दु ष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाहनात जिल्ह्यातील दोन क ट्टर राजकीय वैरी एकत्र बसल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली होती.
  • मात्र, या संयुक्त प्रवासानंतर शिवसेना (शिंदे गट) खासदार ओमराजे निंबाळकर यांनी भाजप आमदार राणा जगजि तसिंह पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
  • “मला त्यांचे तोंडही पाहण्याची इच्छा नसते, ती प्रवृत्तीच वाईट आणि नीच आहे,” अशा कडक शब्दांत ओमराजेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
  • नेमकं काय घडलं…?मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी धाराशिव जिल्ह्याच्या दुष्काळी दौऱ्यावर होते.
  • यावेळी मुख्यमंत्र्यांच्या गाडीत आमदार राणा जगजितसिं ह पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार प्रताप सरनाईक एकत्र प्रवास करताना दिसले.
  • जिल्ह्यातील हे दोन कट्टर राजकीय विरोधक एकाच गा डीत आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला, ज्यामुळे जिल्ह्यात नव्या राजकीय समीक रणांची चर्चा सुरू झाली.
  • केवळ शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठीच गाडीत बसलो:
  • ओमराजेया प्रवासावर माध्यमांशी बोलताना खासदार ओ मराजे निंबाळकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आणि कोणतीही राजकीय तडजोड नसल्याचे ठणकावून सांगितले.
  • ओमराजे म्हणाले, “त्याचे (राणा जगजितसिंह) तोंड पाह ण्याचीही माझी इच्छा नसते. मात्र, राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री तिथे आले होते.
  • आम्ही ज्या जनतेचे आणि शेतकऱ्यांचे नेतृत्व करतो, त्यां च्या व्यथा, अडचणी आणि दुष्काळाची भीषण वस्तुस्थि ती मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणे अत्यंत गरजेचे होते.
  • शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी हीच माझी भावना होती आणि त्यासाठीच मी मुख्यमंत्र्यांच्या गाडीत बसून त्यांना विनंती केली.
  • “‘लढाई कायद्याच्या आधारेच लढणार’पुढे बोलताना ओ मराजे निंबाळकर यांनी आमदार राणा जगजितसिंह पाटी ल यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला.
  • “माझी जी लढाई आहे ती मी न्यायालयीन आणि काय द्याच्या आधारेच लढत राहीन. जी वृत्ती वाईट आहे, नीच आहे, तिचे समर्थन कोणीही करू शकत नाही,” असा घणाघात त्यांनी केला.
  • या एकाच गाडीतील प्रवासामुळे जरी वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले असले, तरी ओमराजे निंबाळकर यांच्या या स्पष्ट आणि आक्रमक पवित्र्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वैर अजूनही तितकेच तीव्र असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles