
डॉल्बीला, ना ढोल-ताशांचा अवाजवी खर्च; परंडा पोलिसांचा अनोखा आदर्श, पोलीस गाडीवरच हालगी वाजवत बाप्पाला दिला निरोप…! शिवछत्रपती गणेश मित्र मंडळाकडून पोलीस प्रशासनासाठी नाष्ट्याचे केली सोय.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- गणेशोत्सवाच्या धा मधुमीत सध्या सर्वत्र डीजे, डॉल्बी आणि ढोल-ताशांचा मो ठा गाजावाजा व अवाजवी खर्च पाहायला मिळत असता नाच, परंडा पोलीस ठाण्याने मात्र समाजासमोर एक अनो खा आणि अत्यंत साधेपणाचा आदर्श घालून दिला आहे.
- परंडा पोलीस स्टेशनच्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक कोणतीही डॉल्बी किंवा डीजे न लावता, थेट पोलीस गाडी वरच पारंपरिक हालगी वाजवून अत्यंत उत्साहात आणि शांततेत काढण्यात आली.
- पोलिसांच्या या पर्यावरणपूरक आणि शांतताप्रिय उपक्रमा चे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

- सध्या मिरवणुकांधील ध्वनी प्रदूषण, डीजेचा वाढता दणद णाट आणि गर्दीमुळे कायदा-सुव्यवस्थेचा निर्माण होणारा प्रश्न ऐरणीवर आहे.
- या पार्श्वभूमीवर, कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या पो लीस प्रशासनाने स्वतःच समाजासमोर एक आदर्श ठेवावा या उद्देशाने हा स्तुत्य निर्णय घेतला होता.
- कोणत्याही अवाजवी खर्चाला फाटा देत अत्यंत साध्या प ण तितक्याच उत्साही वातावरणात परंडा पोलीस ठाण्या च्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले.
- या मिरवणुकीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, मडईपेठ येथील शिवछत्रपती गणेश मित्र मंडळाच्या वतीने विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या पोलीस अधिकारी व अंम लदारांसाठी नाष्ट्याची (अल्पोपहार) उत्तम सोय करण्यात आली होती.
- मंडळाच्या या आपुलकीच्या उपक्रमामुळे पोलीस आणि जनता यांच्यातील सलोख्याचे चित्र पाहायला मिळाले.
- या आदर्श विसर्जन मिरवणुकीप्रसंगी परंडा पोलीस ठा ण्याचे पोलीस निरीक्षक चोरमले, सहाय्यक पोलीस निरी क्षक शिरसट, पोलीस निरीक्षक मुळे, पोलीस उपनिरीक्षक अडसूळ यांच्यासह पोलीस अंमलदार फिरोज शेख, गाय कवाड, शिंदे, गुंडाळे, जगदाळे, झाडे, मेहत्रे, कनचे, जाधव, खताळ, राऊत, पवार, शेवाळे, क्षीरसागर आणि होमगार्ड चा सर्व स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होता.
- सर्वच पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी २४ तास क र्तव्य बजावत असतानाच, बाप्पाच्या या विसर्जन सोह ळ्यात भक्तीभावाने व शिस्तीत सहभाग घेतला.
- परंडा पोलिसांच्या या पाऊलामुळे तालुक्यातील इतर मंड ळांनाही शांततेत आणि पारंपरिक पद्धतीने सण साजरा करण्याची नवी प्रेरणा मिळाली आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






