
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यातून भूम-परंडा-वाशी मतदारसंघ वगळल्याने राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या राज्यातील विविध दुष्काळी भागांचा दौ रा करून परिस्थितीची पाहणी करत आहेत.
- मात्र, त्यांच्या या नियोजित दौऱ्यात भूम-परंडा-वाशी मत दारसंघाचा समावेश न झाल्याने या भागात उलट-सुलट राजकीय चर्चांना जोरदार उधाण आले आहे.
- हा मतदारसंघ आमदार तानाजीराव सावंत यांचा असून, मुख्यमंत्र्यांनी या मतदारसंघाकडे फिरवलेली पाठ सध्या तालुक्यात कमालीची चर्चेचा विषय ठरत आहे.

- मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याकडे लागले होते लक्षचालू वर्षातील तीव्र टंचाई आणि दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, मु ख्यमंत्री फडणवीस हे बाधित क्षेत्रांना भेटी देऊन शेतकरी, स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींशी संवाद साधत आहेत.
- भूम, परंडा आणि वाशी या तिन्ही तालुक्यांमध्ये दुष्काळा ची तीव्रता अधिक असल्याने,मुख्यमंत्री येथे येऊन परिस्थि तीची प्रत्यक्ष पाहणी करतील आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा देतील, अशी दाट शक्यता वर्तवली जात होती.
- आमदार तानाजीराव सावंत यांच्या माध्यमातून या दौऱ्या साठी जोरदार तयारी व पाठपुरावा सुरू असल्याच्याही चर्चा होत्या.
- दौऱ्यातून मतदारसंघ वगळल्याने चर्चांना ऊतमात्र, मुख्य मंत्र्यांच्या अंतिम पाहणी दौऱ्याच्या वेळापत्रकातून भूम-परंडा-वाशी मतदारसंघाचे नाव गायब असल्याने राजकीय कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनतेमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.
- ऐन दुष्काळाच्या काळात मुख्यमंत्र्यांनी आपल्या आमदा राच्या मतदारसंघात येणे का टाळले, याबाबत आता विवि ध तर्कवितर्क लढवले जात आहेत.
- हा केवळ वेळेअभावी झालेला बदल आहे की यामागे का ही अंतर्गत राजकीय समीकरणे आहेत, यावरून कट्ट्या कट्ट्यांवर चर्चा रंगल्या आहेत.
- शेतकऱ्यांमध्ये निराशादुसरीकडे,हक्काच्या लोकप्रतिनिधीं च्या मतदारसंघात राज्याचे प्रमुख येणार नसल्याचे स्पष्ट झाल्यामुळे हवालदिल झालेल्या स्थानिक शेतकऱ्यांमध्ये काहीशी निराशेची भावना पाहायला मिळत आहे.
- मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे या भागासाठी विशेष दुष्काळी पॅकेज किंवा तातडीची मदत जाहीर होईल, अशी अपेक्षा शेतकरी बाळगून होते.
- आता मुख्यमंत्र्यांचा दौरा हुकल्याने स्थानिक प्रशासकीय पातळीवरून आणि आमदारांच्या माध्यमातून शासनाकडे दुष्काळी मदतीसाठी कसा पाठपुरावा केला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






