गुरूंच्या कर्तृत्वाला शिष्यांचा सलाम…! रा.गे.शिंदे महाविद्यालयातील सहा प्राध्यापकांचा माजी विद्यार्थ्यांकडून सत्कार.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूख शेख :- श्री.भवानी शिक्षण प्रसारक मंडळ, धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालय, परंडा येथील विविध विभागांतील सहा प्राध्यापकांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने करिअर ॲ डव्हान्समेंट स्कीम (CAS) अंतर्गत पदोन्नती मिळाल्याबद्द ल महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंचा विशेष सत्कार केला.
  • महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागातील डॉ.शहाजी चं दनशिवे व डॉ.अतुल हुंबे तसेच वनस्पतीशास्त्र विभागाती ल डॉ.प्रकाश सरवदे यांची प्राध्यापकपदी पदोन्नती झाली आहे.
  • तर इंग्रजी विभागाचे डॉ प्रशांत गायकवाड डॉ.सचिन च व्हाण डॉ. संभाजी गाते यांची सहयोगी प्राध्यापकपदी पदोन्नती झाली आहे.
  • ही पदोन्नती विद्यापीठाच्या अकॅडमिक स्टाफ कॉलेज, वि द्यापीठ परिसर, छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या प्रक्रियेनंतर CAS अंतर्गत देण्यात आली.
  • दीर्घकाळाची अध्यापनसेवा, शैक्षणिक योगदान, संशोधन कार्य, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले प्रयत्न आणि महाविद्यालयीन स्तरावरील विविध जबाबदाऱ्यांचा विचार करून ही पदोन्नती देण्यात आली आहे.
  • आपल्या गुरूंना मिळालेल्या या शैक्षणिक सन्मानाचा आ नंद व्यक्त करण्यासाठी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी स मर्थ कुळधर्मे, प्रीतम डाके, सूरज बनसोडे, अनिकेत रोहि टे, शिवम भातलवंडे आणि प्रशांत कोळेकर यांनी महावि द्यालयात येऊन सर्व पदोन्नत प्राध्यापकांचा शाल, पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
  • यावेळी माजी विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त करता ना सांगितले की,महाविद्यालयातील शिक्षकांनी केवळ अ भ्यासक्रमाचे ज्ञान दिले नाही, तर जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनाने पाहण्याची दृष्टी, शिस्त, आत्मविश्वास आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण केली.
  • आज आपल्या गुरूंना प्राध्यापकपदाचा सन्मान मिळणे ही माजी विद्यार्थ्यांसाठीही अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
  • पदोन्नती मिळालेल्या प्राध्यापकांनी माजी विद्यार्थ्यांनी के लेल्या या प्रेमळ सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
  • शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील नाते हे केवळ महाविद्यालयीन जीवनापुरते मर्यादित नसून ते आयुष्यभर टिकणारे असते.
  • माजी विद्यार्थ्यांनी गुरूंच्या कार्याची दखल घेऊन केलेला हा सत्कार शिक्षकांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.
  • महाविद्यालयाच्या शैक्षणिक वाटचालीत सहा प्राध्यापकां ना मिळालेली ही पदोन्नती महाविद्यालयाच्या नावलौकि कात भर घालणारी असून, त्यांच्या यशाबद्दल महाविद्याल यातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व माजी विद्यार्थ्यांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
  • “गुरूंच्या ज्ञानातून घडलेले विद्यार्थी जेव्हा गुरूंच्या यशाचा गौरव करतात, तेव्हा शिक्षक-विद्यार्थी नात्याची खरी श्रीमं ती अधोरेखित होते,” अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles