
मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणूक: डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ संजयकुमार बनसोडे यांच्या निवासस्थानी संवाद
- प्रतिनीधी : फारुख शेख :- मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉ. प्रतापसिंह भैय्या पाटील यांच्या निवडणूक प्रचाराने गती घेतली आहे.
- या प्रचाराचा एक भाग म्हणून आरपीआय (ए) चे प्रदेश स रचिटणीस संजयकुमार बनसोडे यांच्या निवासस्थानी स दिच्छा भेट देऊन सविस्तर संवाद साधण्यात आला.

- या बैठकीदरम्यान मतदारसंघातील पदवीधरांचे प्रश्न, उच्च शिक्षितांच्या रोजगाराच्या संधी आणि मराठवाड्याच्या शैक्षणिक व सामाजिक विकासावर सखोल चर्चा झाली.
- महाविकास आघाडीच्या माध्यमातून पदवीधरांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी यावेळी सांगितले.
- या भेटीदरम्यान संजयकुमार बनसोडे यांनी विविध सामा जिक आणि स्थानिक मुद्द्यांवर चर्चा करत सकारात्मक संवाद साधला.
- या प्रसंगी महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि दोन्ही पक्षांचे स्थानिक नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या या दौऱ्यामुळे मतदारसंघाती ल प्रचाराला अधिक बळ मिळाले असून, मतदारांमधूनही मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






