खेड तालुक्यातील चोरवणे गावच्या श्री रामवरदायिनी, झोलाई,मानाई,वाघजाई देवीचा भव्य नवरात्र उत्सव ११ ऑक्टोबर पासून.

  • प्रतिनीधी : रत्नागिरी : प्रमोद तरळ :- खेड तालुक्याती ल चोरवणे गावची जागृत ग्रामदेवता आदिमाया – आदिश क्ती श्री रामवरदायिनी देवी नवसाला पावणारी आणि हा केला धावणारी देवी म्हणून प्रसिद्ध आहे.
  • देवीच्या दर्शनासाठी मुंबई,पुणे, ठाणे तसेच रायगड, रत्ना गिरी, सातारा,गुजरात आणि विविध गावांमधून, शहरामधू न, परदेशामधून दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक भक्तगण येत असतात.
  • देवीच्या मंदिरात नित्यनेमाने सकाळी व सायंकाळी आर ती होत.
  • यावर्षीचा श्री रामवरदायिनी देवीचा उत्सव रविवार दिनां क ११ ऑक्टोबर २०२६ ते मंगळवार, दिनांक २० ऑक्टो बर २०२६ या कालावधीत भक्तिमय वातावरणात संपन्न होणार आहे.
  • नवरात्र उत्सवादरम्यान महाभिषेक विधिवत पूजा, महामं गल आरती, हरिपाठ,भजन तसेच गरबा (दांडिया रास) रूपी जागर अशा विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमां चे आयोजन करण्यात आले आहे.
  • विशेष कार्यक्रम शुक्रवार १६ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपा री २.०० वाजता महिला भजन मंडळ,तिसंगी ह.भ.प.सौ. स्नेहल नंदकिशोर भोसले यांचे भक्तिमय भजन आयोजित करण्यात आले आहे.
  • शनिवार १७ ऑक्टोबर २०२६ रोजी शिवव्याख्याते कुमार आर्यन बबन मेस्त्री यांचे प्रेरणादायी व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
  • त्यानंतर रात्री १०.०० वाजता शक्तीवाले शाहिर पूनम आ गरकर आणि तुरेवाले शाहिर किशोर सणस यांचा “शक्ती-तुऱ्याचा जंगी सामना” हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
  • रविवार १८ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजता श्री.प्रकाश सकपाळ व सहकारी यांचा भक्तिमय “स्वराभि षेक” भक्तिसंगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
  • मंगळवार दि. २० ऑक्टोबर २०२६ रोजी नवरात्र उत्सवा ची सांगता महाभिषेक, विधिवत पूजा, महामंगल आरती आणि विजयादशमीच्या सीमोल्लंघनाने करण्यात येणार आहे.
  • या पवित्र नवरात्र उत्सवात सर्व भाविक भक्तांनी मोठ्या सं ख्येने उपस्थित राहून आई श्री.रामवरदायिनी देवीचे दर्शन आणि विविध धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ घ्या वा असे आवाहन श्री रामवरदायिनी देवस्थान कमेटी आ णि ग्रामविकास मंडळ मुंबई,पुणे आणि चोरवणे ग्रामस्थ यांनी केले आहे.
  • दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांसाठी महाप्रसादा ची व्यवस्था करण्यात आली आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles