
जिल्हा स्तरीय जलतरण स्पर्धेत ओणी हायस्कूलच्या प्रेरणा आणि गार्गी मोंडे या दोन्ही भगिनी अव्वल.
- प्रतिनीधी : ओणी : प्रमोद तरळ :- जिल्हा क्रीडा परिष द,जिल्हा क्रीडा रत्नागिरी आणि रत्नागिरी जलतरण असो सिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी येथे जिल्हा स्त रीय शालेय जलतरण स्पर्धा आयोजित करण्यात आली.

- जिल्हा स्तरीय शालेय जलतरण स्पर्धेमध्ये राजापूर तालु क्यातील ओणी पंचक्रोशी शिक्षण मंडल संचालित नूतन विद्या मंदिर ओणीच्या इयत्ता १० वी वर्गातील प्रेरणा एक नाथ मोंडे हिने १०० मिटर ब्रेस्ट स्ट्रोक प्रथम क्रमांक, ५० मिटर ब्रेस्ट स्ट्रोक प्रथम क्रमांक, ५० मिटर फ्री स्टाईल प्रथम क्रमांक मिळवून विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली.
- तसेच गार्गी एकनाथ मोंडे इयत्ता ८ वी हिने १०० मिटर ब्रेस्ट स्ट्रोक, ५० मिटर ब्रेस्ट स्ट्रोक यामध्ये प्रथम क्रमांक पटकावत जिल्हा स्तरीय जलतरण स्पर्धेत ओणी शाळे च्या दोघी मुली अव्वल ठरल्या आहेत.
- दोघीं बहिणींचे शाळा आणि ओणीतील सर्व लोकांकडून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. यासाठी कोच विवे क विलेणकर यांनी मार्गदर्शन केले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






