
क्रांतीवीर आणि सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्या ‘क्रांतीवीर’ चित्रपटातील आ गए मेरे मौत तमाशा देखने; प्रेक्षकांच्या मनावर आजही अधिराज्य गाजवले आहे.
- प्रतिनिधी : फारूक शेख :- भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात काही संवाद असे असतात, जे केवळ पडद्यापु रते मर्यादित न राहता प्रेक्षकांच्या मनावर कायमस्वरूपी कोरले जातात.
- असाच एक संवाद म्हणजे, “आ गए मेरी मौत का तमाशा देखने!” अभिनेता नाना पाटेकर यांनी १९९४ मध्ये आले ल्या ‘क्रांतीवीर’ या चित्रपटात अत्यंत आक्रमक आणि ज्व लंत पद्धतीने हा संवाद सादर केला होता.
- आज अनेक दशकांनंतरही हा संवाद आणि त्यातील सा माजिक दाहकता प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहे.
- या चित्रपटात नाना पाटेकर यांनी साकारलेली ‘प्रताप’ ही भूमिका अन्याय आणि भ्रष्टाचाराविरुद्ध लढणाऱ्या एका सामान्य माणसाची होती.
- फाशीच्या तख्तावर उभे असताना, समोरील मूक आणि हताश समाजाला उद्देशून त्यांनी म्हटलेला हा संवाद आज ही तितकाच प्रभावी वाटतो.
- हा संवाद केवळ एक चित्रपटातील ओळ नसून, समाजा च्या ढोंगीपणावर आणि अगतिकतेवर मारलेला एक तीव्र चपराक आहे.
- सोशल मीडियाच्या आजच्या काळातही या संवादाचे मी म्स, रील्स आणि व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असतात, जे या संवादाची लोकप्रियता सिद्ध करतात.

- हा संवाद आजही मराठी आणि हिंदी भाषिक प्रेक्षकांच्या मनातील एक जिवंत आणि धगधगता शब्द बनून राहिला आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






