
जे.सी.सोसायटी बँकेतील कथित गैरप्रकारांची निष्पक्ष चौकशी करा : मनसे रेल्वे कामगार सेनेची मागणी.
- प्रतिनीधी : उदय वाघवणकर :- जे.सी.सोसायटी बँके च्या कर्जप्रकरणांमध्ये कथित गैरप्रकार होत असल्याच्या गंभीर तक्रारी समोर येत आहेत.
- बनावट कागदपत्रे,खोट्या सह्या व शिक्क्यांचा वापर करू न वैयक्तिक कर्ज, शैक्षणिक कर्ज तसेच मुलांच्या लग्नासा ठी कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली काही एजंट काम गारांकडून कमिशनच्या स्वरूपात पैसे घेत असल्याचे आरोप आहेत.

- या सर्व प्रकरणांची सखोल आणि निष्पक्ष चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे.लोअर परळ वर्कशॉपमधील एका रेल्वे कामगाराचे प्रकरण याचे गंभीर उदाहरण आहे.
- संबंधित कामगाराला कर्जाची गरज असताना, त्याला अ धिक रकमेचे कर्ज मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आल्याचा आरोप.
- अर्ज व इतर प्रक्रिया एजंटमार्फत करण्यात आल्या आणि कर्ज मंजूर झाल्यानंतर संबंधित कामगाराकडून कमिशन च्या स्वरूपात रक्कम घेतल्याचे सांगितले जाते.
- काही दिवसांनंतर या प्रकरणासंदर्भात जेव्हा जे.सी. सोसा यटी बँकेकडून लोअर परळ वर्कशॉप प्रशासनाला पत्र प्रा प्त झाले, तेव्हा संबंधित रेल्वे कामगाराला दोन स्तरांनी डाउनग्रेड पेची शिक्षा देण्यात आल्याचे समजते.
- मात्र, या प्रकरणात बँकेतील संबंधित कर्मचारी किंवा इतर जबाबदार व्यक्तींवर काय कारवाई झाली का? जर या प्र करणात बनावट कागदपत्रे तयार करणे, त्यांचा वापर कर णे किंवा नियमबाह्य पद्धतीने कर्ज मंजूर करण्यामध्ये एकापेक्षा अधिक व्यक्तींचा सहभाग असेल,तर प्रत्येकाची भूमिका निष्पक्षपणे तपासली गेली पाहिजे.
- केवळ रेल्वे कामगारावर कारवाई करून इतर संबंधित व्य क्तींना चौकशीपासून दूर ठेवणे हा न्यायाचा योग्य मार्ग ठरू शकत नाही.
- महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेच्या वतीने जे.सी. सोसायटी बँकेच्या संचालक मंडळासमोर या गंभीर विष यावर भूमिका मांडण्यात आली.
- बँकेने स्वतःच चौकशी करून प्रकरणावर पडदा टाकण्या ऐवजी, आवश्यक पुराव्यांसह पोलिसांकडे तक्रार दाखल करावी आणि कायद्याला त्याचे काम करू द्यावे.
- रेल्वे प्रशासनाकडून कामगारावर कारवाई झाली असेल, तर या प्रकरणातील इतर संबंधित व्यक्तींची जबाबदारी देखील तपासली जाणे आवश्यक आहे.

- कामगारांना नियमांचे पालन करण्यास सांगणाऱ्या संस्थां नी स्वतःच्या व्यवस्थेतील संभाव्य गैरप्रकारांबाबतही पार दर्शकता दाखवली पाहिजे.
- जर या प्रकरणाची योग्य चौकशी झाली नाही आणि दोषीं वर नियमानुसार कारवाई करण्यासाठी आवश्यक पावले उचलली गेली नाहीत, तर महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे काम गार सेना आमच्या मनसे स्टाईल मार्गाने आंदोलन करण्या चा पर्याय अवलंबेल असा इशारा देण्यात आला आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






