
हातणकरवाडी ग्रामस्थांनी २ लाखांच्या देणग्या जमा करून लोकसहभागातून जि.प. शाळेच्या ३ वर्गखोल्यांची केली छप्पर दुरूस्ती.
- प्रतिनीधी : राजापूर : प्रमोद तरळ :- तालुक्यातील गोठ हे शैक्षणिकदृष्ट्या सक्षम गाव म्हणून ओळखले जाते. मात्र हातणकरवाडी येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा क्र.२ मधील ३ वर्गखोल्यांचे छत मोडकळीस आले होते.
- यासाठी शासनाकडे वारंवार अर्ज-विनंत्या करूनही आव श्यक निधी उपलब्ध होत नव्हता.
- अखेर कोणत्याही शासकीय अनुदानाची वाट न पाहता ग्रामस्थांनीच लोकसहभागातून सुमारे २ लाख रुपयांच्या देणग्या जमा करून शाळेच्या ३ वर्गखोल्यांच्या छताची दुरुस्ती पूर्ण केली.
- ग्रामस्थांच्या या स्तुत्य उपक्रमाचे गोठणे-दोनिवडे पंचक्रो शीतील नागरिकांकडून कौतुक होत आहे.

- दरम्यानच्या काळात शिळ गावचे सुपुत्र श्री.सुरेश पळसम कर गुरुजी यांची शाळेच्या मुख्याध्यापकपदी नियुक्ती झा ल्यानंतर त्यांनी शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्राम स्थांच्या सहकार्याने मार्च महिन्यात माजी विद्यार्थी संघाची स्थापना केली.
- संघाच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते श्री.प्रसाद सो. हातणकर यांची नियुक्ती करण्यात आली.
- त्यानंतर शाळे च्या छताच्या दुरुस्तीच्या कामाला प्रत्यक्ष गती मिळाली. शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत शैक्षणिक उठावा च्या माध्यमातून हे काम पूर्ण करण्याचा निर्धार केला.
- विशेष म्हणजे, लग्नानंतर अन्य गावांत स्थायिक झालेल्या माहेरवाशिणी माजी विद्यार्थिनींनीही शाळेसाठी आर्थिक योगदान दिले.
- माता पुर्वादेवी ग्रामविकास मंडळ,मुंबई (रजि.) यांच्या सह कार्याने माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात देणग्या जमा केल्या.
- हातणकरवाडीतील ग्रामस्थांसह अन्य समाजातील नाग रिकांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
- केवळ आर्थिक मदतीपुरतेच सहकार्य मर्यादित न राहता अनेक ग्रामस्थांनी प्रत्यक्ष श्रमदान करून या कामात सहभाग घेतला.
- काही दानशूर व्यक्तींनी लाकडी वाशांसाठी लागणारे सा हित्य विनामूल्य उपलब्ध करून दिले, तर काहींनी ते माफ क दिले.
- तसेच लाकडाची वाहतूकही काहींनी सवलतीच्या दरात करून दिली. त्यामुळे लोकसहभागातून हे काम यशस्वी रीत्या पूर्ण होऊ शकले.
- माजी विद्यार्थी संघाच्या पुढाकाराने २६ एप्रिल ते २४ मे २०२६ या कालावधीत लाकडी साहित्याचा वापर करून शाळेच्या ३ वर्गखोल्यांच्या छताची दुरुस्ती पूर्ण करण्यात आली.
- याशिवाय, विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे या साठी बोअरवेलची सर्व्हिसिंगही करून देण्यात आली.
- या कामाच्या जमा-खर्चाचा तपशील ग्रामस्थांसमोर मांड ण्यासाठी गणेशोत्सवाच्या काळात १५ सप्टेंबर २०२६ रोजी शाळेत सभा आयोजित करण्यात आली होती.
- या सभेला मुख्याध्यापक श्री.सुरेश पळसमकर गुरुजी, मा जी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री.प्रसाद हातणकर,शाळा व्य वस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.श्रीधर हातणकर, गावकर श्री.दत्ताराम हातणकर,श्री.भिकाजी हातणकर, श्री.राजारा म दळवी,मुंबई मंडळाचे अध्यक्ष श्री.शांताराम य. कार्याध्य क्ष श्री.प्रकाश दळवी, सचिव श्री.यशवंत जडयार, खजिन दार श्री. दिलीप दळवी, उपाध्यक्ष श्री.दिनकर दळवी,माजी अध्यक्ष श्री.संजय ल.हातणकर, श्रमसाफल्य सहकारी पतसंस्था, खार (मुंबई) चे संचालक श्री. संतोष तु.गोठण कर, ग्रामपंचायत सदस्य श्री.पुनाजी पाजवे,शिक्षक श्री.सं तोष य.हातणकर व श्री. संजय गो. हातणकर,सामाजिक कार्यकर्ते श्री.आशफाक मापारी, मुंबई मंडळाचे श्री.श्रीपत माळी व श्री.सुधाकर माळी, तसेच श्री.पांडुरंग ध.हातणक र, श्री. प्रकाश लोळगे, श्री. सुर्यकांत धों. हातणकर, श्री.अ शोक हातणकर, श्री.महेश पुजारी,श्री.प्रशांत हातणकर, श्री.उदय जडयार,पेंटर श्री.संजय स.हातणकर,श्री. गणपत पुजारी,कु.दर्शन जडयार, कु.आर्या जडयार, कु.स्वरा ज डयार आदी उपस्थित होते.
- तसेच लवकरच लोकसहभागातून उरलेल्या २ वर्गखोल्यां च्या छप्पर दुरुस्तीचे काम केले जाणार आहे असे अध्यक्ष श्री.प्रसाद हातणकर यांनी सांगितले.
- आज अनेक गावांत जि.प. शाळांच्या वर्गखोल्यांचा प्रश्न गंभीर बनत चालला असताना हातणकर वाडीतील ग्राम स्थ, माजी विद्यार्थी आणि मुंबई मंडळाने दाखवलेला एक जूटीचा आदर्श इतर गावांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठर णारा आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






