
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत ‘पवार फॅक्टर’ निर्णायक? चव्हाणांना घेरण्यासाठी डॉ. प्रतापसिंह यांची जोरदार मोर्चेबांधणी….!
- प्रतिनीधी : छ.संभाजीनगर : फारुख शेख :- मराठवा डा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारीनंतर लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे.
- निवडणुकीच्या रिंगणात एकूण ४१ उमेदवार असले, तरी विद्यमान आमदार सतीश चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी–शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ.प्रतापसिंह वेद प्रकाश पाटील यांच्यातच प्रमुख लढत होण्याची राजकीय वर्तुळात चर्चा
- . शैक्षणिक क्षेत्रातील संपर्क, व्यापक जनसंपर्क आणि पाटील परिवाराचे विविध क्षेत्रांतील जुने संबंध यांमुळे डॉ. पाटील यांनी चव्हाण यांच्यासमोर कडवे आव्हान उभे केले आहे.

- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे दिलीप घुगे, अपक्ष उमेदवार रील स्टार अण्णासाहेब साबळे आणि र मेश पाटील यांच्यासह इतर उमेदवारही मैदानात असल्या ने ही लढत बहुरंगी होणार आहे.
- त्यामुळे मतविभाजन आणि पसंतीक्रमाचे गणित अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र,दोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षां च्या उमेदवारांमधील थेट स्पर्धेमुळे या निवडणुकीला विशे ष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
- शरद पवारांना मानणाऱ्या मतदारांचा कौल कोणाला?
- अविभाजित राष्ट्रवादी काँग्रेसने यापूर्वी या मतदारसंघात सातत्याने निवडणूक लढवली आहे.
- शरद पवारांना मानणारा मोठा मतदारवर्ग आणि पक्षाच्या संघटनात्मक ताकदीचा सतीश चव्हाण यांच्या मागील वि जयांमध्ये मोठा वाटा राहिल्याचे पाटील समर्थकांचे म्हण णे आहे.
- चव्हाण यांनी या मतदारसंघाचे सलग तीन वेळा प्रतिनिधि त्व केले असून, आता पक्षातील विभाजनानंतर बदलले ल्या समीकरणांची त्यांची कसोटी लागणार आहे.
- यावेळी शरद पवारांच्या पक्षाकडून डॉ.प्रतापसिंह पाटील मैदानात असल्याने पवारांना मानणारा मतदारवर्ग त्यांच्या पाठीशी किती प्रमाणात उभा राहतो, हा कळीचा मुद्दा असेल.
- पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची ताकद प्रभावी पणे एकवटल्यास त्याचा थेट फायदा डॉ. पाटील यांना मिळू शकतो.
- शैक्षणिक क्षेत्रातील संपर्क ही जमेची बाजू
- शिक्षण क्षेत्राशी थेट संबंध असल्यामुळे डॉ.पाटील यांना शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विविध क्षेत्रांतील पदवीधरांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्याची मोठी संधी आहे.
- शैक्षणिक संस्थांतील सहकारी, माजी विद्यार्थी आणि व्य क्तिगत संपर्क यांच्या माध्यमातून त्यांचा प्रचार वेगाने वि स्तारत आहे.
- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी–शरदचंद्र पवार पक्षाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे संघटनात्मक कामाचा दांडगा अनुभव आहे.
- बंधू आमदार डॉ.राहुल पाटील यांचे संपर्क क्षेत्र, तसेच पा टील परिवाराचे दीर्घकालीन सामाजिक व राजकीय संबंध यांमुळे पक्षीय चौकटीपलीकडे जाऊन त्यांना पाठिंबा मि ळविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
- नव्या चेहऱ्याबद्दल उत्सुकता; विद्यमान प्रतिनिधीच्या कामगिरीची कसोटी
- चव्हाण यांच्या तीन कार्यकाळांतील कामगिरीबाबत काही मतदारांमध्ये नाराजी असल्याचा दावा पाटील समर्थकांक डून केला जात आहे.
- पदवीधरांचे प्रश्न, रोजगार, स्पर्धा परीक्षा आणि शिक्षण क्षे त्रातील अडचणींवर अपेक्षित काम झाले का, हा मुद्दा प्रचा रात प्रामुख्याने पुढे येत आहे.
- दुसरीकडे, उच्चशिक्षित आणि शिक्षण क्षेत्राशी जोडलेला नवा चेहरा म्हणून डॉ.पाटील यांच्याबद्दल मतदारांमध्ये उत्सुकता आहे.
- समोरच्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून घेण्याची तयारी, संयमी संवाद आणि सर्वसामान्यांमध्ये सहज मिसळण्याचा स्वभा व या गुणांवर त्यांच्या प्रचारात भर दिला जात आहे.
- संपर्कांना मतदारांच्या विश्वासाची जोड मिळणार का….?
- सतीश चव्हाण यांच्याकडे दीर्घ निवडणूक अनुभव आणि स्वतःचे मोठे संपर्कजाळे आहे. त्यामुळे डॉ.पाटील यांच्या साठी ही लढत अटीतटीची आणि आव्हानात्मक आहे.
- या विस्तीर्ण मतदारसंघात कार्यकर्त्यांचा समन्वय, मतदा रांशी थेट संवाद आणि मतदानाच्या दिवशीचे अचूक नियो जन निर्णायक ठरेल.
- शैक्षणिक संपर्क, पाटील परिवाराचे वैयक्तिक संबंध आणि शरद पवारांच्या पक्षाची संघटनात्मक ताकद यांना पदवीध रांच्या विश्वासाची जोड मिळाली, तर डॉ. प्रतापसिंह पाटी ल विजयाचे प्रमुख दावेदार ठरू शकतात.
- चव्हाण आपला गड राखणार की डॉ.पाटील बाजी मार णार, याकडे संपूर्ण मराठवाड्याचे लक्ष लागले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






