
भोत्रा येथे शॉर्ट सर्किटने ऊस जळाला; नुकसानभरपाईसाठी शेतकऱ्याची तहसीलदारांकडे मांगनी.
- प्रतिनिधी : परंडा : फारुख शेख :- परंडा तालुक्यातील भोत्रा येथील शेतकरी यशवंत मारुती पवार यांच्या शेतात डेपी आसल्याने लोड आचानक कमी जास्त झाल्याने शॉर्ट झाले त्या शॉर्ट सर्किटमुळे उसाला आग लागून नुकसान झाली – घटना १६ ऑक्टोबर २०२६ रोजी.

- या नुकसानीची पंचनामा करून भरपाई मिळावी, अशी मागणी त्यांनी परंडा तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
- यशवंत पवार यांच्या निवेदनानुसार, भोत्रा येथील त्यांच्या गट क्रमांक ९९ मधील जमीन क्षेत्र ० हेक्टर २१ आर असू न, शेतातील डीपीच्या शॉर्ट सर्किटमुळे दुपारी २ वाजण्या च्या सुमारास ऊस जळाला. या घटनेत त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

- या नुकसानीची महसूल विभागामार्फत प्रत्यक्ष पाहणी क रून पंचनामा करण्यात यावा आणि नियमानुसार नुकसा नभरपाई मिळावी, अशी विनंती शेतकरी यशवंत मारुती पवार यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

- वीज यंत्रणेतील बिघाडामुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन नुकसा नग्रस्त शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






