
येळवण बौद्धजन विकास मंडळातर्फे धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा.
- प्रतिनीधी : मुंबई : प्रमोद तरळ :- महालक्ष्मी (पू) शांती नगर येथील म्युनिसिपल पब्लिक शाळेच्या सभागृहात ये ळवण बौद्धजन विकास मंडळ, मुंबई व ग्रामीण,संघमित्रा महिला मंडळ, येळवण व भीम सैनिक कला मंच यांच्या वतीने अशोका विजया दशमी व ७० वा. धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
- कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार चंद्रशेखर सुरेश जाध व हे होते तर सुनील हरी जाधव यांनी सूत्रसंचालन केले.
- तथागत भगवान गौतम बुद्ध, सम्राट अशोक व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

- यावेळी 21 सेवानिवृत्त वरिष्ठ नागरिकांचा आकर्षक सन्मा नचिन्ह, पंचशील पट्टी व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
- दहावी बारावी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ देऊन विशेष स न्मान करण्यात आला.
- इतर सर्व विद्यार्थ्यांचा पेन व पॅन्सिल बॉक्स देऊन गुणगौ रव करण्यात आला. ह्या कार्यक्रमात मुंबई मंडळाचे अध्य क्ष चंद्रशेखर जाधव, सरचिटणीस सुनील जाधव, ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष महेंद्र जाधव, चिटणीस दशरथ जाधव, रा जापूर तालुका गट क्र. ५ चे चिटणीस दीपक जाधव, संघ मित्रा महिला मंडळाच्या अध्यक्षा प्रियंका जाधव, चिटणी स वैशाली जाधव यांची प्रमुख भाषणे होते.
- सेवानिवृती सन्मानमूर्ती मोहन बाबुराव जाधव (ज्येष्ठ सा हित्यिक) यांचे भाषण झाले. तर विद्यार्थ्यांच्या गुणगौरवा नंतर कुमार जय जाधव यांनी भाषण केले.

- हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी येळवण बौद्धजन विका स मंडळ,मुंबई संघमित्रा मंडळाचे कार्यकर्त्या व भीम सैनि क कला मंचाचे तरुण कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतले. शेवटी सरणंतय घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






