कोट्यवधींच्या सिमेंट रस्ता कामाचा पुरता बोजवारा; डोमगाव फाटा ते कंडारी फाटा रस्ता ६ महिन्यांपासून खोदलेल्या अवस्थेत….! ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हास्ते उद्घाटन झाले होते.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- देवस्थान सोनारी,कं डारी आणि डोमगाव श्रीराम मंदिराकडे जाणाऱ्या भावि कांसह ग्रामस्थांचे अतोनात हाल डोमगाव फाटा ते कंडारी फाटा या मुख्य रस्त्याचे क्राँक्रीट (सिमेंट) रस्त्यात रूपांतर करण्यासाठी राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यां च्या हस्ते मोठ्या थाटामाटात उद्घाटन करण्यात आले होते.
  • मात्र, उद्घाटनाचा नारळ फुटून सहा महिने उलटले तरी का माला गती मिळण्याऐवजी हा रस्ता गेल्या ६ महिन्या पासू न पूर्णपणे खोदून ठेवण्यात आला आहे.
  • कंत्राटदार आणि संबंधित प्रशासनाच्या कमालीच्या दिरंगा ईमुळे हा रस्ता सध्या वाहनधारक आणि पादचाऱ्यांसाठी मृत्यूचा सापळा बनला असून, नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
  • धार्मिक स्थळांना जोडणारा मुख्य मार्ग ठप्प
  • हा रस्ता केवळ स्थानिक वाहतुकीसाठीच नाही,तर ऐतिहा सिक आणि धार्मिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे.
  • प्रसिद्ध देवस्थान सोनारी, कंडारी तसेच डोमगाव येथील श्री क्षेत्र श्रीराम मंदिराकडे जाणारे शेकडो भाविक दररोज याच मार्गाचा वापर करतात.
  • रस्ता खोदून ठेवल्यामुळे खड्डे, धूळ आणि उखडलेल्या दग ड-धोंड्यांमधून प्रवास करावा लागत असल्याने भाविकांचे अतोनात हाल होत आहेत.
  • त्यातच वयोवृद्ध नागरिक आणि महिलांना या रस्त्यावरून प्रवास करताना मोठा मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे.
  • ६ महिन्यांपासून प्रशासन सुस्त; कंत्राटदार बेफिकीर
  • रस्त्याचे काम सुरू करण्याच्या नावाखाली ६ महिन्यांपूर्वी संपूर्ण रस्ता उकरून टाकण्यात आला.
  • त्यानंतर कंत्राटदाराने काम अत्यंत संथ गतीने चालवले अ सून सध्या ते जवळपास बंद अवस्थेत आहे.
  • ग्रामविकास मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झाले तेव्हा या भागा चा विकास होणार म्हणून परिसरातील जनतेने आनंद व्य क्त केला होता, पण आता ६ महिन्यांपासून केवळ धुळीचे साम्राज्य आणि खड्ड्यांचा जाच पदरी पडल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
  • स्थानिक ग्रामस्थांची संतप्त प्रतिक्रिया
  • याबाबत बोलताना स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. “मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झा ले म्हणून आम्हाला वाटले की काम दर्जेदार आणि वेगाने होईल.
  • मात्र, ६ महिने झाले तरी रस्ता फक्त खोदून ठेवला आहे. लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना जनतेच्या त्रासाशी काहीही देणेघेणे राहिलेले नाही.
  • धुळीमुळे श्वसनाचे आजार वाढत आहेत आणि रोज अप घात होत आहेत,” अशी संतप्त प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांनी दिली आहे.
  • अपघातांची मालिका आणि प्रशासकीय अनास्था
  • खोदलेल्या रस्त्यामुळे या मार्गावर दुचाकी घसरून किरको ळ व गंभीर अपघात होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.
  • रात्रीच्या वेळी तर पथदिव्यांचा अभाव आणि उखडलेले दगड यांमुळे प्रवास करणे जीवघेणे बनले आहे.
  • या गंभीर समस्येकडे ग्रामविकास विभाग, सार्वजनिक बां धकाम विभागाचे संबंधित अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा थेट आरोप नागरिक करत आहेत.
  • आंदोलनाचा इशारा
  • ग्रामविकास मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या महत्त्वा च्या रस्त्याची जर ६ महिन्यांत ही दुरवस्था असेल, तर सा मान्य रस्त्यांचे काय? असा संतप्त सवाल माहिती अधिका र कार्यकर्ते आणि परिसरातील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
  • संबंधित विभागाने तातडीने या खोदलेल्या रस्त्याचे काम पूर्ण करून तो वाहतुकीसाठी खुला करावा, अन्यथा परिस रातील संतप्त नागरिक, भाविक आणि ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा देण्यात आला आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles