माळशिरस नगरसेविका ॲड.रेश्माताई टेळे यांना राज्यस्तरीय आदर्श लोकप्रतिनिधी महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान.

  • प्रतिनीधी : योगेश सुळे :-  नगरसेविका ॲड.रेश्माताई टे ळे यांना राज्यस्तरीय आदर्श लोकप्रतिनिधी महाराष्ट्र गौरव पुरस्कार नुकताच पुणे येथे एमआयटी ग्रुप पुणे चे संचाल क महेश थोरवे यांच्या हस्ते देण्यात आला.
  • मेडल ट्रॉफी पंचा मानाचा फेटा सन्मानपत्र देऊन गौरव ण्यात आले.
  • या कार्यक्रमास राष्ट्रभक्ती महिला संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष सौ.भारती तुपे ग्रेट पीपल सोशल फाउंडेशनच्या अध्यक्ष प्रियंका अबनावे राष्ट्रभक्ती परिवाराचे अध्यक्ष सुनील गोरे आधी मान्यवर व पुरस्कार करते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  • रेश्माताई टेळे या सर्वसामान्य कुटुंबातील असून प्रथमच त्यांनी माळशिरस नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये विज य संपादन केला होता.
  • तेव्हापासून समाजसेवेचा वसा आणि वारसा घेऊन त्या स माजासाठी सातत्याने झटत राहिल्या शोषित आणि वंचित घटकांना घेऊन विकासाची गंगा दारापर्यंत नेली.
  • प्रभाग क्रमांक 11 मध्ये त्यांनी विकासाचे मॉडेल काय अ सते ते दाखवून दिले त्याचबरोबर नगरसेवक आपल्या दा री ही संकल्पना आणली.
  • त्याने प्रभाग क्रमांक 11 मध्ये रस्ते असतील गटारी अस तील नळ कनेक्शन असतील दिवाबत्ती असेल स्वच्छता असे अनेक सामाजिक कामे केली.
  • गतवर्षी माळशिरस शहरातील पाणीटंचाई लक्षात घेऊन पूर्वीपासून गावाला पाणीपुरवठा करणारी जुनी विहीर त्यातील स्वखर्चाने गाळ काढून गावासाठी पाणी उपलब्ध करून दिले.
  • अशा अनेक उल्लेखनीय कामाची दखल घेऊन राष्ट्रभक्ती परिवाराच्या वतीने हा पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून कौ तुक होत आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles