ओणी-पाचल रस्त्याची तातडीने दुरुस्ती करा: राजापूर काँग्रेसचे बांधकाम विभागाला निवेदन; प्रवाशांच्या गैरसोयी बद्दल तालुकाध्यक्ष सतीश बंडबे यांनी वेधले लक्ष.

  • प्रतिनीधी : राजापूर : प्रमोद तरळ :- राजापूर तालुक्या तील ओणी ते पाचल या महत्त्वपूर्ण मुख्य रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, या रस्त्याची तातडीने दुरु स्ती व डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी राजापूर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सतीश बंडबे यांनी सार्वजनिक बां धकाम विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
  • निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता, उप विभाग राजापूर यांना सादर करण्यात आले.
  • ओणी ते पाचल हा रस्ता तालुक्यातील अनेक गावांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. मात्र, सध्या या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली आहे.
  • रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, अनेक ठिकाणचे डांबरीकरण पूर्णपणे उखडले आहे.
  • त्यामुळे वाहनचालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे.
  • विषेशतः पावसाळ्यानंतर रस्त्याची परिस्थिती अधिकच बिकट झाली असून, नागरिकांना धुळीचाही मोठ्या प्रमा णावर त्रास सहन करावा लागत आहे.
  • या मार्गावरून दररोज शालेय विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी तसेच रुग्णांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते.
  • त्याचबरोबर अनुस्कुरा घाटमार्गे कोल्हापूरशी जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असल्याने या रस्त्यावर अवजड व हलक्या वाहनांची मोठी वर्दळ असते.
  • अशा परिस्थितीत रस्त्यावरील खड्ड्यांमुळे प्रवाशांना त्रा स सहन करावा लागत असून, लहान-मोठ्या अपघातांची शक्यताही वाढली आहे.
  • त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
  • संबंधित विभागाने या रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करून तात डीने दुरुस्तीचे काम हाती घ्यावे. रस्त्यावरील खड्डे बुजवून आवश्यक त्या ठिकाणी दर्जेदार डांबरीकरण करण्यात यावे.
  • तसेच या मागणीवर प्रशासनाने काय कार्यवाही केली, या बाबत लेखी स्वरूपात उत्तर द्यावे, अशी मागणी निवेदना तून करण्यात आली आहे.
  • यावेळी राजापूर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सतीश बंडबे, शह राध्यक्ष अझीम जैतापकर, राजापूर नगरपरिषदेच्या काँग्रे स नगरसेविका अफरोज झारी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रदीप भाटकर, हारून साठी, निसार मुल्ला आदी उपस्थि त होते.
  • ओणी-पाचल रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना दररोज करावा लागणारा त्रास लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभागाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांक डून व्यक्त होत आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles