आलेश्वर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद..! एकाच दिवशी १५२ रुग्णांची तपासणी; महिला, ज्येष्ठ नागरिकांसह लहान मुलांनी घेतला मोफत आरोग्यसेवेचा लाभ.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी आणि आर्थिक अडचणींमुळे कोणताही रुग्ण उपचारांपासून वंचि त राहू नये, या सामाजिक बांधिलकीतून तालुक्यातील आ लेश्वर येथे २५ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आले ल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
  • या शिबिरात तब्बल १५२ रुग्णांची मोफत आरोग्य तपास णी करण्यात आली.
  • गावातील महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांनी मोठ्या संख्येने शिबिरात सहभागी होत आरोग्य तपासणी करून घेतली.
  • रक्तदाब, मधुमेह, ताप, सर्दी, खोकला तसेच विविध सर्व साधारण आजारांची तपासणी करून रुग्णांना मोफत औषधोपचार देण्यात आले.
  • तसेच गंभीर किंवा पुढील उपचारांची आवश्यकता अस लेल्या रुग्णांना योग्य वैद्यकीय मार्गदर्शन करण्यात आले.
  • डॉक्टरांच्या पथकाकडून रुग्णांची तपासणी
  • या आरोग्य शिबिरात डॉ.गौरव पाडवी, डॉ.स्नेहेल मोरे, डॉ. एमी वर्गीस, डॉ.ज्योतिरीमा सरकार, डॉ.शौलिन पठाण, डॉ.शांतनू सोनवणे, डॉ.वर्जमालिनी नाडार, डॉ. इद्रीस पुंणे वाला यांच्यासह अमीन सय्यद, भीमाशंकर उंबरे, ऋषिके श करमुरे,श्रीशेल गुंड, प्रतीक दुधे, सचिन व्हटकर, अशोक धंगेकर, राहुल माने व शाम चव्हाण यांनी आरोग्यसेवेत मोलाचे योगदान दिले.
  • मान्यवरांची उपस्थिती; ग्रामस्थांचे विशेष सहकार्य
  • यावेळी फारुख मुलाणी (माजी सरपंच व सरचिटणीस, भाजपा), दीपक ठोसर (माजी सरपंच), दयानंद सूर्यवंशी (माजी ग्रामपंचायत सदस्य), रमेश पाटील, ग्रामसेवक राय कर, शांतिवान पाटील, शाम पाटील, स्वाती नगरे (आशा कार्यकर्ती), बिलकीस मुलाणी (आशा गटप्रवर्तक), सादि क मुलाणी (पोलीस पाटील) व सुरेश पाटिल इत्यादि उपस्तीत होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles