
परंडा येथे संविधान दिन उत्साहात साजरा; डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- भारतीय संविधान दिनानिमित्त २६ नोव्हेंबर रोजी परंडा येथे भारतीय संविधा नाचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यां च्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्या त आले.
- यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले) पक्षाच्या परंडा येथील कार्यालयात रिपाईचे महाराष्ट्र प्रदेश चिटणी स संजय कुमार बनसोडे साहेब यांच्या हस्ते पूजन कर ण्यात आले.

- त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली.
- यावेळी भारतीय संविधानाचे महत्त्व, डॉ.बाबासाहेब आंबे डकर यांचे विचार, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या संविधानिक मूल्यांचे जतन करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.
- या कार्यक्रमास रिपाईचे ज्येष्ठ नेते फकीरदादा सुरवसे, ता लुकाध्यक्ष दादासाहेब सरवदे, सोशल मीडिया आयटी सेलचे धाराशिव जिल्हाध्यक्ष आकाश बनसोडे, ज्येष्ठ नेते संजीवन भोसले, हरिभाऊ आढाळे, लालासाहेब भालेराव, विकास गोमसे, भारत धेंडे, धनाजी यशवद, बापू हावळे, लक्ष्मण सरवदे, बापू लोंढे, प्रभू शेलार, सत्यपाल बनसोडे, उत्तम ओव्हाळ आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
- कार्यक्रमाची सांगता महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करून करण्यात आली.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






