
ॲड.भाई मिर्लेकर यांनी केले रिक्षा चालकांचे प्रबोधन, जोगेश्वरीतील वाहतूक विभागाचा स्तुत्य उपक्रम.
- प्रतिनिधी : उदय वाघवणकर :- मुंबई वाहतूक पोलीस अंतर्गत जोगेश्वरी वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक महे श गिरमे यांनी त्यांच्या अधिपत्याखालील क्षेत्रातील ऑटो रिक्षा चालकांना १मार्च २०२५ पासून लागू झालेले भारता तील सुधारित मोटार वाहन नवीन दंड आणि नियमांची माहिती देण्यासाठी एक विशेष सभा आयोजित केली होती.
- ॲड.भाई मिर्लेकर यांना पोलिसांमार्फत निमंत्रित केले हो ते ॲड.भाई मिर्लेकर यांनी उपस्थित रिक्षा चालक आणि पोलीस कर्मचाऱ्यांना १ मार्च २०२५ पासून लागू झालेले नवीन दंड आणि नियमांची माहिती दिली.
- पोलीस आणि वाहन चालक यांच्यामधील समन्वय वृद्धिंग त होऊन वाहतूक कायदे आणि नियम काटेकोरपणे पाल न करणे किती आवश्यक आहे ते समजावून सांगून जुना दंड नवीन वाढीव दंड यातील फरक समजावून सांगितला.
- तसेच ऑटो रिक्षा चालक आणि मीटर टॅक्सी चालक यां च्या कल्याणासाठी झटणाऱ्या महामंडळाची माहिती देऊ न या महामंडळाचे सदस्य होण्याचे आवाहन केले.
- तसेच पोलिसांनाही वाहन चालकांना समजून घेऊन माणु सकीचा धर्म पालन करण्याचा सल्ला दिला. कारवाईचा बडगा उगरण्यापूर्वी सत्यता पडताळून पाहणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
- कार्यक्रमाच्या शेवटी उप निरीक्षक जाधव यांनी उपस्थितां चे आभार मानले.याप्रसंगी पोलीस निरीक्षक महेश गिरमे, पोलीस उप निरीक्षक जाधव, आणि पोलीस उप निरीक्षक श्रीमती. बांदेकर उपस्थित होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/