
सेंट अँथनी हायस्कूलमध्ये ‘टेक्नोव्हा’ प्रदर्शनात डिजिटल व्यसनावर जागरूकता सत्र: पालक-विद्यार्थ्यांना प्रभावी मार्गदर्शन.
- प्रतिनिधी : मुंबई : प्रमोद तरळ :-सेंट अँथनी हायस्कूल, वाकोला,सांताक्रूझ पूर्व येथे शाळेच्या वार्षिक दिनानिमित्त पालक आणि विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण जागरूकता सत्र आयोजित करण्यात आले.
- या सत्रात डिजिटल व्यसनाच्या वाढत्या समस्येवर प्रकाश टाकण्यात आला, ज्यात प्रदर्शन आणि व्याख्यानांचा समा वेश होता.
- नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याचे कार्यकारी समिती सद स्य आणि राष्ट्रीय प्रशिक्षक श्री.बॉस्को डिसोझा यांच्या मा र्गदर्शनाखाली हे सत्र यशस्वी झाले.

- वार्षिक उत्सवाच्या उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणू न श्री.संजय जावीर (शिक्षण निरीक्षक, पश्चिम प्रदेश), मॅने जर रेव्ह.डॉ.फादर फ्रान्सिस कार्व्हालो आणि पर्यवेक्षक श्रीमती सँड्रा कार्डोझो यांची उपस्थिती लाभली.
- श्री विवेक साळवी यांच्या समन्वयाने श्री.बॉस्को डिसोझा यांनी मुलांमध्ये आणि प्रौढांमध्ये वेगाने वाढणाऱ्या डिजि टल व्यसनावर प्रकाश टाकला.
- यासाठी एन.आय.एस. डी.चा शक्तिशाली ‘नवचेतना मॉ डेल’ पीपीटी सादरीकरणाच्या माध्यमातून सादर करण्यात आला.
- या मॉडेलद्वारे डिजिटल व्यसनाच्या परिणामांवर उपाययो जना आणि प्रतिबंधक उपक्रमांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
- या कार्यक्रमाला व्यवस्थापक रेव्ह फ्र.डॉ.फ्रान्सिस कार्व्हा लो, मुख्याध्यापिका: सिस्टर शैलेत सेबॅस्टियन, पर्यवेक्षक श्रीमती सॅंड्रा कार्डोझा, श्रीमती मोना डालमेट आणि श्रीम ती रियाली डाबरे यांनी उत्कृष्ट पाठिंबा दिला.
- सत्राचा शेवट प्रश्नोत्तर सत्राने झाला, ज्यात पालक आणि शिक्षकांनी सक्रिय सहभाग घेतला. शिक्षक आणि पालकां नी या व्यावहारिक सत्राची प्रशंसा करताना, असा कार्यक्र म भविष्यात वारंवार, विशेषतः शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्याची मागणी केली.

- डिजिटल युगातील व्यसनाच्या धोक्यांबाबत जागरूकता वाढवण्यासाठी हे सत्र एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले.
- शाळेच्या वार्षिक दिवसाच्या निमित्ताने आयोजित हे उप क्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











