
“वसई RTO मध्ये नियमांना हरताळ – बेकायदेशीर एसी बसवून जनतेच्या पैशांवर थंडावा! अनंत पाटील यांची आग्रही मागणी : ‘एसी काढा, अन्यथा मुख्यमंत्र्यांकडे तक्रार…!’”
- प्रतिनिधी : अनंत पाटील :-वसईच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात प्रचंड गैरप्रकार उघड झाला असून, माहिती अधिकारात प्राप्त माहिती नुसार कोणतीही वैध शासकीय परवानगी, निविदा प्रक्रिया किंवा आर्थिक मंजुरी न घेता वातानुकूलन यंत्र (AC) कार्यालयात बसवण्यात आले आहे.
- हे उघड होताच माहिती अधिकार वापरकर्ता व सुसाशन कार्यकर्ता अनंत पुंडलिक पाटील यांनी संबंधित अधिका ऱ्यांवर कठोर कारवाईसह एसी तत्काळ काढण्याची स्पष्ट मागणी केली आहे.
- अनंत पाटील यांची ठाम मागणी अशी आहे की –
- “बेकायदेशीर एसी काढण्यात यावा, जबाबदार अधिका ऱ्यांवर कठोर शिस्तभंगाची कारवाई व्हावी, आणि भवि ष्यात असे प्रकार टाळण्यासाठी पारदर्शक व उत्तरदायी त्वपूर्ण यंत्रणा तयार करावी.”
- त्यांनी दिलेल्या निवेदनात पुढील गंभीर बाबी मांडल्या आहेत :
- शासन नियमांचे उल्लंघन: महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ चं सर्रास उल्लंघन.
- निधीचा गैरवापर: सार्वजनिक वित्त व जबाबदारी अधिनियमानुसार अनधिकृत खर्च.
- मालमत्तेचा दुरुपयोग: कार्यालयीन साधनांचा वैयक्तिक सोयीसाठी वापर.
- परवानगी नसलेली कृती: कोणतीही निविदा, लेखी मंजुरी किंवा शासकीय प्रक्रिया न पार पाडता यंत्र बसवणे.
- अनंत पाटील यांनी १५ दिवसांची मुदत दिली असून, त्यानं तर ही बाब थेट मुख्यमंत्री,परिवहन आयुक्त, राज्य माहिती आयोग, महालेखापाल आणि लोकायुक्त यांच्याकडे तक्रा रीसह नेण्यात येईल, असा इशाराही दिला आहे.
- “लोकांच्या पैशातून अधिकाऱ्यांना थंडावा, पण नियम पाळायचे नाहीत?”
- हा सर्व प्रकार जनतेच्या पैशाचा अपमान असून, दोषींना तत्काळ जबाबदार धरलं गेलं पाहिजे, हीच नागरिकांची तीव्र मागणी आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/