
अकोला बाजार येथे चिमुकल्यांनी वृक्ष रोपण करून जागतिक पर्यावरण दिन केला साजरा.
- प्रतिनिधी : सचिन कोयरे : यवतमाळ :- ५ जून जागति क पर्यावरण दिन या दिनानिमित्त अकोला बाजार येथील स्वच्छता दूत गजानन घुले आणि अंगणवाडी सेविका साधनाताई वाघाडे यांच्या मार्गदर्शनाखाली चिमुकल्यांनी वृक्षारोपण करून पर्यावरणाचे रक्षण,त्याचे जतन,संवर्धन, पर्यावरणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी इयत्ता दुसरी ते पा चवीत व अंगणवाडीत असणार्या चिमुकल्यांनी आपल्या हाती जनजागृतीचे फलक व एक वृक्षरोप हाती घेत येथी ल आठवडी बाजारात वृक्ष रोपण करून पर्यावरणाचे कि ती महत्त्व आहे हे त्यांच्या कार्यातून चिमुकल्यांनी दाखवुन दिले.
- आम्ही छोटे मात्र काम आमचे मोठे अश्या या उक्तीतून ना गरिकांना वृक्षाविषयीचे प्रेम,सर्रास होत असलेली वृक्ष कटाई, या वृक्षांचा भविष्यात होणारा नागरिकांना फायदा, हल्ली झालेली जागतिक तापमानात वाढ तसेच या ताप मानात होणारा बदल, त्यामुळे या उद्भवलेल्या जागतिक समस्येला थांबवायचे असेल तर प्रत्येकाने एक झाड लाऊ न समस्येवर उपाय होण्याचा मार्ग बना असा संदेश या वृक्षारोपणातून चिमुकल्यांनी दिला.
- यावेळी ऋचिता प्रविण नेवारे, कल्याणी गणेश नेवारे, सो नाक्षी संतोष राऊत, दिव्यानी ज्ञानेश्वर मंडाळे, आदिती ग णेश खंडारे, आर्यन शिवा बडवणे, निखिल गणेश खंडारे, साक्षी अंगद मूर्खे या चिमुकल्यांना स्वच्छता दूत गजानन घुले, साधनाताई वाघाडे यांनी मोठी मदत करत हा जागति क पर्यावरण दिन साजरा केला.
- या उपक्रमाने गावातील नागरिकांची चिमुकल्यांनी मने कौ तुकाची थाप मिळविली. चिमुकल्यांच्या उत्साहाने नागरि कांनी या पावसाळ्यात एक झाड लावणार असा निर्धार केला.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/