
कोळवणखडीचे प्रगतशील शेतकरी नागेश बने यांच्या भात शेतीवर यंदा पडला करपा रोग गेल्या वर्षी भातपीक स्पर्धेत पटकावला होता प्रथम क्रमांक.
- प्रतिनीधी : राजापूर : प्रमोद तरळ :-तालुक्यातील कोळ वण खडी येथील प्रगतशील शेतकरी नागेश बने यांच्या भा त शेतीवर करपा रोग पडून शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
- मागील वर्षी जिल्हामध्ये भातशेती पिक स्पर्धेत प्रथम क्र मांक पटकावणारे नागेश बने यंदा मात्र भात शेतीला मुक णार आहेत. त्यांच्या सर्व शेतीवर करपा रोग पडून पूर्णता भात शेतीची वाट लागली आहे.

- त्यातच पाऊसाने दडी मारल्यामुळे अती उन्हाची झळ सर्व शेतकरी वर्गाला बाधित होत आहे. त्या मधेच बने सारख्या अनेक शेतकरी वर्गाची शेती संपुष्टात आली आहे.
- तर दुसऱ्या बाजूने पावसाने तोंड काढल्याने शेतकरी वर्ग पुरताच हवालदिल झाला आहे. शेतीच्या तोंडावर पिके येवून तिथेच ती खुंटली जात आहेत.
- असा दुतर्फी फटका शेतकरी वर्ग झेलत आहे. अशा परि स्थितीत शेतकरी वर्ग करणार तरी काय असा पेच पडून राहीला आहे.
- शासनाने या सर्व गोष्टीचा पुरेपूर अभ्यास करून आधीच दुष्काळ जाहीर केला आहे.
- परंतु वर्षभराची शेती जर का वाया गेली तर शासन देवून देवून असे काय देणार आणि शेतकरी वर्गांचे सांत्वन कसे काय करणार तेंव्हा संबधीत खात्याने पूर्ण विचार करून प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन पहाणी क रावी आणि योग्य तो मोबदला द्यावा अशी मागणी तालु क्यातील शेतकरी वर्गाने केली आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






